ठाकरे सरकारमधल्या राज्यमंत्र्याकडून CM च्या आवाहनाची पायमल्ली, शेकडो कार्यकर्त्याची जमवली तोबा गर्दी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी श्रद्धास्थान चैत्यभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी आवाहन केले होते. ऑनलाईन दर्शन घेण्याची मुख्यमंत्र्यांनी तमाम आंबेडकरी अनुयायांना विनंती केली होती. मात्र, ठाकरे सरकारमधल्या एका मंत्र्याकडूनच मुख्यमंत्र्याच्या आवाहनाची पायमल्ली झाल्याचे समोर आले आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी स्वतःच्या मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमवून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

डॉ. बाबासहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ( 6 डिसेंबर) श्रद्धास्थान चैत्यभूमीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करत ऑनलाईन दर्शन घेण्याची विनंती तमाम आंबेडकरी अनुयायांना केली होती. त्यानुसार सर्वांनीच या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शेकडो लोकांना एकत्र करत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. याशिवाय उपस्थित बांधवांचे आभार देखील मानायला राज्यमंत्री विसरले नाहीत. राज्यमंत्र्यांनीच गर्दी जमवल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.