शेतकरी बांधवांनो पेरणी करताय ? थोड थांबा, कृषी विभागाने केले ‘हे’ आवाहन, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापून टाकले आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस (Rain) झाला असून नद्या – नाल्यांना पूर आले आहे.
पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची (Farmers) पेरणीची लगबग सुरु केली आहे.
मात्र आता याचसंदर्भात कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शेतकऱ्यांनी (Farmers) किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो त्यामुळे पाऊस खंड पडल्यास पीक तग धरू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

खुशखबर ! परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या

गेल्या काही दिवसात राज्यात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्र, नागपूर, मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस (Rain) पडत आहे.
परंतू तो सर्वत्र सारख्याच प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे.
सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजना करिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.
विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी.
खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत.
सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी आणि वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : maharashtra monsoon agriculture department appeal farmers do not start farming 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा