Maharashtra Monsoon Session | ‘हे उचित नाही’, अजित पवारांची पुतण्या रोहित पवारांवर नाराजी, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) आज सकाळपासून विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed Constituency) प्रस्तावित एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी, या मागणीसाठी रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशानात (Maharashtra Monsoon Session) आंदोलन केलं होतं. विधानसभेतही या मुद्यावर चर्चा झाली. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी रोहित पवारांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, रोहित पवारांच्या या कृतीवर काका अजित पवार (Ajit Pawar) नाराज झाल्याचे दिसून आले. रोहित पवार यांच्या कृतीवर अजित पवार यांनी अधिवेशानात भूमिका मांडली.

विधानभवनाबाहेर (Legislature) रोहित पवार आंदोलनाला बसले असताना दुसरीकडे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (MLA Anil Deshmukh) रोहित पवारांची बाजू विधानसभेत मांडत होते. रोहित पवारांनी MIDC स्थापनेची मागणी गेल्या अधिवाशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. त्यावेळी उदय सामंत यांनी अधिवेशन संपण्याआधी अध्यादेश काढला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आता दुसरं अधिवेशन आलं. तरी अजूनही तो आदेश निघालेल्या नाही. त्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्याची शासनाने दखल घ्यावी, असं देशमुख म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांकडून समज

यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावरुन विरोधकांना समज दिली. त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या पायऱ्यांवर आंदोलन करायचं नाही हा निर्णय सभागृहात एकमताने झाला होता. त्याबाबत आम्ही रोहित पवारांना आवाहन केलं आहे. माझी विनंती आहे की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी त्यांची समजूत काढावी. रोहित पवारांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

रोहित पवारांच्या मुद्यावरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुखांनी विधिमंडळ सदस्यांबाबत एक मुद्दा उपस्थित केला.
त्यासंदर्भातील एका पत्राची कॉपी माझ्याकडे आहे. उदय सामंत यांनी 1 जुलै 2023 ला रोहित पवारांना पत्र दिलं आहे.
या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) संबंधितांसमवेत बैठकीचं आयोजन करुन योग्य
तो निर्णय घेतला जाईल, उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा असं पत्र उदय सामंत यांनी दिले आहे.
मंत्रीमहोदय पत्र देतात, अजून अधिवेशन संपलेलं नाही. एकच आठवडा झालेला आहे. आत्ताच दुसरा आठवड सुरु झालाय.
लोकप्रतिनिधींनी उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आंदोलनाला बसणं उचित नाही,
असं अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार, घेणार दगडूशेठचे दर्शन