Maharashtra Monsoon Session | ‘आईच्या पोटी कोणी…’, विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, अध्यक्षांना करावा लागला हस्तक्षेप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक विषयांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पाचव्या दिवशी ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) आणि शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.

आदित्य ठाकरे म्हणाले, सभागृह सुरु होण्यापूर्वी मंत्र्यांचा खातेवाटप होतो. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. प्रत्येक दिवशी खातेवाटप होते. एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो. आम्ही सगळे आमच्या मतदारसंघातून येतो. महाराष्ट्रात आम्ही आवाज देतो. यावर, विधानसभा अध्यक्ष, अधिवेशनापूर्वी (Maharashtra Monsoon Session) जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली आहे. त्यांची यादी मी काल सभागृहात वाचून दाखवली आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाची चर्चा नको.

यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही माहिती दिली त्यावेळी मी काल रायगडमध्ये होतो.
पण एवढचं आहे आता जशी परिस्थिती झाली की एक सदस्य मंत्रीमहोदयांसाठी उत्तर देत आहेत.
सकाळी जे काही लक्षवेधी आम्हाला देतात त्याच्यावर मंत्र्यांचा अभ्यास पक्का असावा, असा टोला गुलाबराव पाटलांना लगावला.

मायच्या पोटी कोणी हुशार…

गुलाबराव पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे फार अभ्यास करुन आले आहेत. मला माहित आहे. ऐनवेळी सर्व प्रश्न आले.
यावेळी आदित्य ठाकरे मध्ये बोलत होते. तर गुलाबराव पाटील म्हणाले, मायच्या पोटी कोणी हुशार होवून जन्माला येत नाही.
तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहिती असतील. या वक्तव्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले.
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी हस्तेक्षेप करत सर्वांना शांत केलं.

Jairaj Group Pune | जयराज ग्रुपचे संस्थापक स्व. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 7 व्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी

Pune Court slaps drivers who violate traffic rules, ‘arrest warrant’ against those who don’t appear for settlement