Maharashtra NCP Crisis | अजित पवारांनी गेम फिरवला! जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची आमदारकी धोक्यात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra NCP Crisis | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) यांनी अजित पवार यांच्यासह 9 आमदारांना अपात्र (MLA Disqualified) करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलं आहे. यानंतर अजित पवार यांनी मोठी खेळी करत जयंत पाटलांच्या कारवाईला प्रत्युत्तर दिलं आहे. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अपात्र करण्याबाबत कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते आज (Maharashtra NCP Crisis) पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

अजित पवार म्हणाले,मी माध्यमांमध्ये बघितले की, नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलं आहे. मी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेल्या विधीमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे.(Maharashtra NCP Crisis)

 

एकाला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद म्हणून नेमलं गेलं आहे अशी बातमी मी वाचली. विधिमंडळामध्ये मी बरीच वर्ष काम केलं आहे. विरोधी पक्षनेता नेमायचे काम हे विधानसभा अध्यक्षांचे असतं. अधिवेशन सुरु असताना विधानसभा अध्यक्ष सत्तेत नसलेल्या पक्षामध्ये ज्याची संख्या जास्त असते त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करतात. राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी, यासाठी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याला काही अर्थ नाही, असं म्हणत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला.

एकीकडे अजित पवारांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई साठी पाऊल
टाकलं असतानाच दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Praful Patel)
आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
शरद पवारांची ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

 

Web Title : Maharashtra NCP Crisis | ajit pawar faction about sharad pawar faction jayant patil jitendra awhad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Travelling In Railway Without Ticket | पुणे रेल्वे विभागात जून महिन्यात 25 हजारहून अधिक विना तिकीट लोकांकडून दंड वसूली

ACB Trap Case News | 15 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा