Maharashtra New DGP | वरिष्ठ IPS अधिकारी रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रजनीश सेठ (Rajnish Seth) यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती (Maharashtra New DGP) करण्यात आली आहे. संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही (Court) सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे सरकारने रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर (Maharashtra New DGP) नियुक्ती केली.

 

रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या (Azad Maidan Riots) वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त (Joint Commissioner of Police) होते. ते फोर्स वन (Force One) महाराष्ट्राचे प्रमुख राहिले आहेत. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव (Principal Secretary) म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

 

सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे एप्रिल 2021 पासून महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळत होते. राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळावा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अखेर आज रजनीश सेठ यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक (Maharashtra New DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई 26/11 जेव्हा दहशतवादी हल्ला (Mumbai 26/11 Terrorist Attack) झाला होता. त्यावेळी एका फोर्स वन पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी ते या पथकाचे प्रमुख होते. रजनीश सेठ हे दोन वर्षे मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (Additional Commissioner of Police, Mumbai) होते.

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची नियुक्ती करण्याची एक पद्धत आहे.
राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाला (Central Public Service Commission)पाठवावी लागतात.
युपीएससीकडून (UPSC) त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात.
यातून पूर्णवेळ महासंचालकाची नियुक्ती केली जाते. हेमंत नगराळे (Hemant Nagarale),
के. वेंकटेशम (K Venkatesham), रजनिश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस युपीएससी कडून करण्यात आली होती.
यानंतर रजनीश सेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

Web Title :- Maharashtra New DGP | maharashtra dgp Rajnish Seth as director general of maharashtra police force

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा