Vitamin D : ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ 6 फूड्सचा आहारात करा समावेश

नवी दिल्ली :वृत्त संस्था – हिवाळ्यात व्हिटॅमिन डी (Vitamin D) च्या कमतरतेमुळे (deficiency of Vitamin D) आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. व्हिटॅमिन डी शरीराला रोग, हाडांशी संबंधित समस्या आणि मौसमी फ्लूशी (SeasonalFlu) लढण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी (Immunity) वाढते. तसेच सामान्य आजारांविरुद्ध लढण्यासाठी ऊर्जा मिळते. सूर्यप्रकाशाद्वारे नैसर्गिकरित्या देखील व्हिटॅमिन डी  (Vitamin D)  मिळवता येते.

याशिवाय पुरेसे व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी तुम्ही काही पदार्थां (Foods) चा आहारात समावेश करू शकता. हे शरीरातील रोगांशी लढण्यास आणि इम्युनिटी (Immunity) वाढविण्यास मदत करतील.

व्हिटॅमिन डीसाठी या पदार्थांचा आहारात करा समावेश (Include these foods in your diet for vitamin D)

1. अंड्याचा पिवळा बलक (Egg yolk)
अंड्यातील पिवळ बलक व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत (egg yolk benefits) आहे. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. अंड्याच्या पांढर्‍या भागात प्रोटीन असतात. अंड्यातील पिवळ बलकमध्ये चरबी आणि खनिजे आढळतात.

2. दही (curd)
दह्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे पचनसंस्थेसाठीही चांगले असते. त्यामुळे इम्युनिटी वाढते आणि हाडे मजबूत होतात.

3. दलिया (Oatmeal)
दलिया व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी परिपूर्ण आहे. नाश्त्यात दुधासोबत खाऊ शकता. दलिया खाल्ल्याने देखील मधुमेह टाळता येतो.

4. मशरूम (Mushrooms)
आपल्या आहारात समावेश करण्यासाठी मशरूम हे एक आवश्यक अन्न् आहे. हे व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे. अतिनील प्रकाशाच्या संपर्कात आलेले मशरूम हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्त्रोत आहे. पास्ता आणि सॅलडच्या स्वरूपात तुम्ही मशरूमचे सेवन करू शकता. याशिवाय मशरूममध्ये व्हिटॅमिन बी1, बी2, बी5 आणि कॉपर यांसारखी खनिजेही मुबलक प्रमाणात असतात. मशरूमच्या विविध जातींमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण देखील बदलते.

 

5. दूध (Milk)
दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध घ्या. हिवाळ्यात दुधात चिमूटभर हळद मिसळून झोपण्यापूर्वी प्या.
यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल आणि तुम्ही सर्व आजारांपासून दूर राहाल. दुधातही कॅल्शियम (Calcium) भरपूर असते.

6. सोया प्रॉडक्ट (soya products)
तुम्ही तुमच्या आहारात टोफू, सोयाबीन आणि सोया मिल्क यासारख्या सोया उत्पादनांचा समावेश करू शकता.
या उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. सोया व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title : vitamin d to overcome the deficiency of vitamin d add these foods in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Best Foods For Sound Sleep | रात्री शांतपणे झोपायचे असेल तर,
बिछान्यात जाण्यापूर्वी आवश्य खा ‘या’ 5 वस्तू

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा