Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police News | केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police News) 43 जणांचा पदक (Medal) देऊन सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना राज्याचे पोलीस महासंचालक रजनिश शेठ (DGP Rajnish Seth) यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानीक करण्यात आले. मुंबईत बुधवारी (दि.15) झालेल्या समारंभात तपास अधिकाऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.

पुरस्कारपात्र अधिकारी यांचे नाव, पद व नेमणुक (Maharashtra Police News)

1. राज तिलक रोशन (Raj Tilak Roshan), पोलीस उप आयुक्त, वाहतूक, मुंबई (DCP Traffic, Mumbai)
उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वाघोली येथे विहिरीमध्ये अनोळखी मुलीचा गळा चिरुन खून केलेला मृतदेह | मिळून आला होता. मयत मुलीच्या केवळ कपडयावरील लेबलवरून फ्लिपकार्ट कंपनीकडे तपास करून मयताची ओळख पटवुन, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासी अधिकारी यांनी कोणताही पुरावा नसताना अत्यंत क्लिष्ट गुन्हा चार दिवसात उघडकीस आणला आहे.

 

2. दिपक पुंडलिक देवराज (Deepak Pundalik Devraj), पोलीस अधिक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई (SP EOW Mumbai)
ठाणे ग्रामीण, भाईंदर पोलीस स्टेशन अंतर्गत ६ वर्षाच्या पिडीत मुलीवर बलात्कार करुन तिचा गळा दाबुन खुन केला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीस मा. न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा | सुनावली आहे.

3. सुरज पांडुरंग गुरव (Suraj Pandurang Gurav), अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (Addl SP ACB Pune)
कोल्हापुर जिल्हा शाहुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत शित्तूर वारूळ येथे अनोळखी युवकाचा शीर विरहित मृतदेह नदिकाठी मिळून आला होता. त्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर शीर नदीत टाकून दिलेले होते. तपासी अधिकारी यांनी या खून बाबत कोणताही पुरावा नसताना आरोपी निष्पन्न करून अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे.

 

4. रमेश नागनाथ चोपडे (Ramesh Nagnath Chopde), अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव, जळगाव (Addl SP Chalisgaon, Jalgaon)
सातारा जिल्हा फलटन पोलीस स्टेशन अंतर्गत १४ वर्षीय मुलाचा पैशाच्या कारणावरून खून करण्यात आला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

5. दिनेश विठ्ठलराव अहेर (Dinesh Vitthalrao Aher) , पोलीस निरीक्षक (Police Inspector), बेलवंडी पोलीस स्टेशन. अहमदनगर (Belwandi Police Station. Ahmednagar)
बीड जिल्हा आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपीने कर्जाच्या। रकमेपोटी मयताचा खुन केला होता. तपासी अधिकारी यांनी गुन्हयाचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केल्याने मा. न्यायालयाने ०३ आरोपींना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

6. शशिराज गुंडोपथ पाटोळे (Shashiraj Gundopath Patole), पोलीस निरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कार्यालय
अहमदनगर जिल्हा कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत कोपडी येथे १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करून क्रूरपणे तिचा खून करण्यात आला होता. सदरच्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा | तपासी अधिकारी यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन ३ आरोपींना अटक करून ठोस पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले. मा. न्यायालयाने ०३ आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

7. चिमाजी जगन्नाथ आढाव (Chimaji Jagannath Adhav), पोलीस निरीक्षक, सायखळा पो.स्टे, मुंबई
मुंबई बोरीवली पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा वर्षाच्या मतिमंद मुलीवर अज्ञात आरोपीने लैंगिक अत्याचार केले होते. तपासी अधिकारी यांच्या कौशल्यपूर्ण व अविरत प्रयत्नांनी आरोपीस अटक करून गुन्हा | उघडकीस आणला आहे.

 

8. सुरज जयवंत पाडवी (Suraj Jaywant Padavi), पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मिरा भाईंदर वसई विरार
नवी मुंबई, सानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत बँक ऑफ बडोदा | जुईनगर शाखा येथील ३० लॉकर्स फोड्न ३ कोटी ४३ लाख रु. किंमतीच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली होती. तपासी अधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेवून गुन्हयातील आरोपीना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे,

9. सुनिल किसन धनावडे (Sunil Kisan Dhanawade), पोलीस निरीक्षक
सिंधुदुर्ग जिल्हा सांवतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आंबोली घाटात दरीमध्ये एक हजार फुट खोलीवर एक डोके नसलेला अनोळखी मृतदेह मिळाला होता. कोणताही पुरावा नसताना केवळ मृतदेहाच्या हातातील लाल धाग्यावरून ओळख पटवून क्लिष्ट गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून तपासी अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

10. सचिन मुरारी कदम (Sachin Murari Kadam), पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई
मुंबई, विलेपार्ले पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादीवर पिस्टलने दोन राउंड फायर करून आरोपी पळून गेले होते. हा गुन्हा रवी पुजारी गँगच्या सदस्यांनी केला होता असे निष्पन्न झाले. त्यामध्ये सहा आरोपींना अटक करून देशी बनावटीचे पिस्टल व राउंड जप्त केले.

 

11. धनंजय चित्तरंजन पोरे (Dhananjay Chittaranjan Pore), सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण
ठाणे ग्रामीण जिल्हा, टोकवडे पोलीस स्टेशन अंतर्गत अनोळखी महिलेचा गळा दाबून खुन करण्यात आलेला मृतदेह आढळून आला होता. सीसीटीएनएस माहीतीच्या आधारे ओळख पटवून अज्ञात आरोपीस गुलबर्ग, कर्नाटक येथून अटक करून तपासी अधिकारी यांनी कोणताही पुरावा नसताना केवळ तीन दिवसांत सदरचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे.

12. अविनाश लक्ष्मीनारायण आघाव (Avinash Lakshminarayan Aghav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर
औरंगाबाद शहर, जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागुन अज्ञात आरोपींनी त्याचा खुन केला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. आहे.

13. श्रध्दा अशोक वायदंडे (Shraddha Ashok Vaidande), सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिडको पो स्टे औरंगाबाद
ठाणे शहर, शिळ डायघर पोलीस स्टेशन अंतर्गत ११ वर्षाच्या विकलांग मुलीवर अज्ञात आरोपींनी बलात्कार करून तिला गंभीर। जखमी केले होते. तपासी अधिकारी यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे दोन आरोपींना २० वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

14. सुरेश नानाभाऊ रोकडे (Suresh Nanabhau Rokade), सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
मुंबई व्ही. पी. रोड पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपी फिर्यादीच्या ऑफिसमध्ये घुसुन धारदार शस्त्राने हल्ला करून ३ लाख ७० हजार रु. रोख रक्कम घेवून गेला होता. तपासी अधिकारी यांचे अथक प्रयत्न व कौशल्यपूर्ण तपास यामुळे मा. न्यायालयाने आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

15. प्रदिप विजय भानुशाली (Pradeep Vijay Bhanushali), सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
ठाणे शहर, कापुरवावडी पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपीने ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. सदर प्रकरणी केलेल्या गुणवत्तापुर्ण तपासामुळे मा. न्यायालयाने आरोपीला आजन्म कठोर कारावासाची शिक्षा सुनावली । आहे.

16. प्रशांत श्रीराम अमृतकर (Prashant Shriram Amritkar), सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड
सोलापुर जिल्हा, माढा पोलीस स्टेशन अंतर्गत ३५ वर्षीय इसमाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात होता. तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे यातील ३ आरोपींना मा. न्यायालयाने आजन्म कठोर कारावासाची व प्रत्येकी ०२ लाख रु | दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

17. हेमंत सुभाष पाटील (Hemant Subhash Patil), पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण
धुळे जिल्हा मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन पिडीत मुलीवर ७ अज्ञात आरोपींनी सामुहीक बलात्कार केला होता. तपासी अधिकारी यांनी अत्यंत संवेदनशील गुन्हयाच्या केलेल्या कौशल्य पुर्ण तपासामुळे मा. न्यायालयाने ०७ आरोपींना आजन्म कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

18. प्रियांका महेश शेळके (Priyanka Mahesh Shelke), पोलीस निरीक्षक लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर
कोल्हापुर जिल्हा गडहिंग्लज पोलीस स्टेशन अंतर्गत १३ वर्षीय पीडीत मुलीवर ५० वर्षीय आरोपीने बलात्कार केला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे मा. न्यायालयाने आरोपीस २० वर्षे कारावासाची शिक्षा दिली आहे.

 

19. सागर जगन्नाथ शिवाळकर (Sagar Jagannath Shivalkar), पोलीस निरीक्षक दादर पोलीस स्टेशन मुंबई
मुंबई बी. के. सी. पोलीस स्टेशन अंतर्गत १० वर्षीय मुलीवर चाकुचा धाक दाखवून बलात्कार केला होता. कोणताही पुरावा नसताना तांत्रिक तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे यातील तपासी अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणला.

 

20. संजय देवराम निकुंबे (Sanjay Devram Nikumbe), सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
मुंबई एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत ०२ अज्ञात आरोपींनी फिर्यादीस जबर दुखापत करून त्यांचेकडील १ कोटी ३३ लाख रुपयांचे सोन्याचे व हि-याचे दागिने जबरदस्तीने पळवून नेले होते. तपासी अधिकारी यांनी अत्यंत क्लिष्ट अशा गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हयातील १ कोटी २७ लाख रुपयांची OPPO Reno7 5G मालमत्ता जप्त केली.

21. सुधाकर दत्तु देशमुख (Sudhakar Dattu Deshmukh), पोलीस निरीक्षक, मुंबई
मुंबई दादर पोलीस स्टेशन अंतर्गत दादर फुलमार्केट येथे अज्ञात आरोपीनी गोळ्या घालुन एका व्यक्तीची हत्या केली होती. तपासी, अधिकारी यांनी ४८ तासांच्या आत गुन्हा उघड करून ०४ आरोपीना | दिल्ली व उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

 

22. सचिन सदाशिव माने (Sachin Sadashiv Mane), पोलीस निरीक्षक, शिवडी, मुंबई
मुंबई एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत कुरियर कंपनीचे कार्यालयात ०४ अज्ञात आरोपींनी पिस्टल व चाकुचा धाक दाखवून रोख रक्कम १४ लाख व ०३ मोबाईल चोरुन नेले होते. गुन्ह्याचा सखोल तांत्रिक तपास करून ०४ आरोपींना दिल्ली व राजस्थान | येथून अटक केली आहे.

 

23. शिवाजी पंडीतराव पवार (Shivaji Pandi Rao Pawar) पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र | पोलीस अकादमी, नाशिक
पुणे शहर विश्रामबाग पोलीस स्टेशन अंतर्गत CPI (माओवादी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यासाठी आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने निधी गोळा करून बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरला होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तपासी अधिकारी यांनी वेगवेगळ्या राज्यातून अटक केले होते. गुन्ह्याच्या तपासाचे व केस डायरीचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक करण्यात आले आहे.

24. राजेंद्र सिद्राम बोकडे (Rajendra Sidram Bokde), सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक
औरंगाबाद जिल्हा सिल्लोड पोलीस स्टेशन अंतर्गत दुकानातील चार | लाख रुपये जमा रक्कम फिर्यादी घरी घेवुन जात असताना आरोपीने त्यांच्यावर चाकुने वार करून जबरी चोरी केली होती. घटनास्थळी मिळालेल्या आरोपीच्या शर्टच्या बटणावरून तपास करून २ आरोपींना अटक करून तपासी अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

25. उत्तम दत्तात्रय सोनावणे (Uttama Dattatraya Sonavane), पोलीस निरीक्षक कापुरबावडी पो.स्टे., ठाणे शहर
मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रेनमध्ये ४४ वर्षीय । | महिलेचा चोरीच्या उद्देशाने अतिशर क्रूरपणे खून झाला होता. कोणताही धागादोरा नसताना तपासी अधिकारी यांनी केलेल्या अथक प्रयत्न व कौशल्यपूर्ण तपास यामुळे अत्यंत क्लिष्ट असा गुन्हा उघडकीस आला आहे.

 

26. नरेंद्र कृष्णराव हिवरे (Narendra Krishnarao Hivare), पोलीस निरीक्षक, विशेष सुरक्षा पथक, नागपुर
नागपूर जिल्हा गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत गांधीसागर तलावामध्ये दोन पोत्यामध्ये तुकडे केलेला पुरूष मृतदेह मिळून आला होता. तपासी अधिकारी यांनी तांत्रिक तपास पध्दतींचा अत्यंत खुबीने | वापर करून गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

27. ज्योती लक्ष्मण क्षिरसागर (Jyoti Laxman Kshirsagar), पोलीस अधिक्षक, पोलीस संशोधन केंद्र, पुणे.
बीड जिल्हा आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत राजकीय वादातून खुनाचा गुन्हा घडला होता. तपासी अधिकारी यांनी तांत्रिक तपास पध्दतीचा अतिशय कौशल्यपूर्ण वापर केल्यामुळे गुन्ह्यातील ५ आरोपीना आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

28. अनिल तुकाराम घेरडीकर (Anil Tukaram Gherdikar), अपर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
परभणी जिल्हा बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत ५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीस त्याच्या नैसर्गिक जीवनापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

29. नारायण देवदास शिरगावकर (Narayan Devdas Shirgaonkar), सहायक पोलीस आयुक्त,
पुणे शहर
परभणी जिल्हा सोनपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत ५ वर्षीय अल्पवयीन |
मुलीचे अपहरण व बलात्कार करून तिचा खून करण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त होता.
अतिशय संवेदनशील गुन्ह्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसताना यातील तपासी अधिकारी
यांनी कौशल्यपूर्ण व चिकाटीने केलेल्या तपासामुळे आरोपीस आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा | सुनावली आहे.

 

30. समिर नजीर शेख (Samir Nazeer Shaikh), पोलीस अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई
नाशिक जिल्हा अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत मुथ्थुट फायनान्सच्या | शाखेवर दरोडा पडला होता. तपासी अधिकारी यांनी कोणताही पुरावा नसताना तपास करून आरोपींना पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश व बिहार येथून अटक करून गुन्हा उघड केला.

31. किसन भगवान गवळी (Kisan Bhagwan Gawli), सेवानिवृत्त पोलीस आयुक्त
सांगली जिल्हा, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व पाशवी बलात्कार करून तिचा खून केला होता. तपासी अधिकारी यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपीस मा. न्यायालयाने ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षासुनावली आहे.

 

32. कोंडीराम रघु पोपेरे (Kondiram Raghu Popere), सेवानिवृत्त पोलीस | निरीक्षक
नवी मुंबई, कळंबोली पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब ठेवला होता. सदर बॉम्ब डिटेक्ट करून | नाश करण्यात आला होता. तपासी अधिकारी यांनी नाविन्यपुर्ण तपास | पध्दतींचा वापर करून चार आरोपींना जिवंत IED सह अटक करून गुन्हा उघडकीस आणला.

 

33. ममता लॉरेन्स डिसोजा (Mamta Lawrence D’Souza), वरिष्ठ पोलीस | निरीक्षक, कोपरी पोलीस | स्टेशन, ठाणे शहर
नवी मुंबई कामोठे पोलीस स्टेशन अंतर्गत ३ वर्षे वयाच्या चिमुरडीवर आरोपीने निर्दयपणे बलात्कार करून तिला गंभीररित्या जखमी केले होते. तपासी अधिकारी यांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपीस | नैसर्गिक जीवनापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

34. पद्मजा अमोल बढे (Padmaja Amol Bade), सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मिरा भाईंदर वसई विरार
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस स्टेशन अंतर्गत ७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे रेल्वेस्टेशन वरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मा. उच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासास Ideal Case म्हणून गौरविले आहे.

 

35. अलका धिरज जाधव (Alka Dhiraj Jadhav), सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर ए.टी.एस. मुंबई,
मुंबई बी. के.सी. सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत मा. पंतप्रधान यांच्या नावाने उच्चशिक्षीत आरोपींनी बनावट ९ अॅप व ३ वेबसाईट तयार केल्या होत्या. देशभरातील चार लाख लोकांची लोन देण्याच्या | बहाण्याने फसवणूक केली होती, तपासी अधिकारी यांनी सायंटिफिक दुल्सच्या मदतीने केलेल्या तांत्रिक तपासामुळे अत्यंत क्लिष्ट गुन्हा उघडकीस आला.

 

36. प्रिती प्रकाश टिपरे (Priti Prakash Tipre), पोलीस अधिक्षक, डायल ११२, नवी मुंबई,
सोलापूर शहर, विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत १५ वर्षीय | मुलीवर ११ अनोळखी आरोपींनी निर्दयपणे सामूहिक बलात्कार केला होता. तपासी अधिकारी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला.

37. राहूल ढालसिंग बहुरे (Rahul Dhal Singh Bahure), सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुंबई.
लातूर जिल्हा औसा पोलीस स्टेशन अंतर्गत अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरोपीने त्याच्या मित्राचा खून केला होता. तपासी अधिकारी यांनी केलेल्या तांत्रिक तपासामुळे आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच पुराव्यांची योग्य | साखळी तयार केली याकरीता मा. न्यायालयाने तपासी अधिकारी। यांची प्रशंसा केली आहे.

 

38. मनोहर नरसाप्पा पाटील (Manohar Narsappa Patil), पोलीस उप अधिक्षक, अॅन्टी करप्शन, वरळी,
मुंबई
ठाणे शहर, मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत एकतर्फी प्रेमप्रकरणातून ७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्यात आला होता.
तपासी अधिकारी यांनी कोणताही पुरावा उपलब्ध नसताना केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

39. बाबुराव भाऊसो महामुनी (Baburao Bhauso Mahamuni), अपर पोलीस अधिक्षक,
बुलढाणा
बुलढाणा जिल्हा चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत रात्रीच्या वेळी रस्त्याच्या शेजारील शेडमध्ये निवा-यासाठी झोपलेल्या ९ वर्षाच्या मुलीला,
आईच्या कुशीतून उचलुन नेवुन, अतिशय निर्दयी व क्रूरपणे बलात्कार करण्यात आला होता.
तपासी अधिकारी यांचे अथक प्रयत्न व केलेला कौशल्यपूर्ण तपास यामुळे मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

40. अजित राजाराम टिके (Ajit Rajaram Tike), उप विभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर,
सातारा जिल्हा मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय सैन्यदलामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून कामगार मुलांकडून आरोपीने दिङ लाख रुपये घेतले होते.
भरती न झाल्यामुळे पैसे परत मागण्याचा तगादा लावला म्हणून आरोपीने दोन्ही कामगार मुलांना व त्यांचे आई वडील
यांना अन्नातून विष देवून जिवे ठार मारले होते. गुन्ह्याचा | तांत्रिक तपास करून तपासी अधिकारी यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

41. सुनिल शंकर शिंदे (Sunil Shankar Shinde), पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट -1 नवी मुंबई
नवी मुंबई,
तुर्भे पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपीने महिला फिजिओथेरपीस्ट यांच्याकडे उपचार घेण्याच्या बहाण्याने विनयभंगाचे 47 प्रकार केले होते.
तपासी अधिकारी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आरोला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला.

 

42. सुनिल देविदास कडासने (Sunil Devidas Kadasane), पोलीस अधिक्षक, नागपूर रेल्वे अहमदनगर जिल्हा,
शिर्डी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यातील 12 आरोपींनी त्यांच्या टोळीची दहशत निर्माण व्हावी यासाठी दोन अल्पवयीन मुलांचा क्रूरपणे खून केला होता.
तपास अधिकारी यांनी संघटित टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये केलेल्या गुणवत्तापुर्ण तपासामुळे 12
आरोपींना आजन्म कारावास व ए कोटी 32 लाख रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.

43. उमेश शंकर माने पाटील (Umesh Shankar Mane Patil), सहायक पोलीस आयुक्त, कल्याण,
ठाणे शहर
अकोला जिल्हा, रमदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत रस्त्यात भिक मागणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीवर तीन आरोपींनी सामुहिक बलात्कार केला होता.
तपास अधिकारी यांनी केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे गुन्ह्यातील आरोपींना नैसर्गिक जीवनापर्यंत कारावासाची शिक्षा झाली आहे.
न्यायालयाने तपासी अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाकरीता गौरवले आहे.

 

 

Web Title :-  Maharashtra Police News | 43 police officers of the state have been honored with medals by the Union Home Ministry for their outstanding crime investigations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; ऑईल इंडिया लिमिटेड संघाला विजेतेपद

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल