Pune Police Mcoca Action | येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या जुनेद शेख टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी MCOCA कारवाई

पुणे : Pune Police Mcoca Action | येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्‍या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कारवाई (Pune Police Mcoca Action) केली आहे.

जुनेद एजाज शेख Junaid Ejaz Shaikh (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे Avinash alias Sukya Sanjay Shinde (वय २१, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या दीपक काळोखे Mangesh alias Ghulya Deepak Kalokhe (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), निखील ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे Nikhil alias Bodi Jagannath Shinde (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) व त्यांचा एक साथीदार अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत. निखील शिंदे हा फरार असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जुनेद शेख व त्याच्या साथीदारांनी २६ डिसेबर रोजी लक्ष्मीनगर येथे येऊन धारधार हत्यारे व दगड घेऊन ते हवेत फिरवून शिवीगाळ केली. कोई आगे आयेगा तो नही छोंडेंगे, अपने अपने घर जाऔ, असे म्हणून लोकांना धमकाविले. त्यांच्यावर दगडफेक केली. फिर्यादी व त्याचा भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. तसेच तेथील २७ वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली होती. (Pune Police Mcoca Action)

जुनेद शेख याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचाराचा वापर करुन नागरिकांच्या मनात भिती निर्माण केली. दिवसा, रात्री घरफोडी करणे, गरीब, असहाय्य युवकांना जमवून त्यांना पैशांचे व इतर प्रकारचे अमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे साथीदार बनवून त्यांच्याकडून गुन्हे करवुन घेत असल्याचे आढळून आले.

येरवडा पोलीस ठाण्याचे (Yerwada Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला. शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) हे तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव (PI Kanchan Jadhav), जयदिप गायकवाड, निगराणी पथकाचे सहायक निरीक्षक महेश लामखडे (API Mahesh Lamkhade), पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, देविदास वांढरे यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्या कार्यकाळातील ही १११ वी मोक्का कारवाई आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

गॅस एजन्सीमध्ये गुंतवणुक करायला लावून साडेसहा लाखांची फसवणूक

डाव्या बाजूने ओव्हरटेक करणार्‍या दुचाकीस्वाराने बसचालकाला केली मारहाण