Pune BJP News | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र भेट

पुणे : Pune BJP News | भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या नूतन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र भेट देण्यात आले. (Pune BJP News)

खालापूर (जि. रायगड) चे पत्रकार राजीव मुळेकर यांनी त्यांच्या कॅमेर्‍यात टिपलेल्या छायाचित्राची फ्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती चे शहर समन्वयक संदीप खर्डेकर, आ. भीमराव तापकीर, माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पत्रकार राजीव मुळेकर, त्यांच्या कन्या सौ.सुरूची मुळेकर / कडलासकर, नात सारा मुळेकर,स्पृहा कडलासकर, पुरूषोत्तम खिरे, संगीता खिरे माधुरी मुळेकर, नितिन भावे, उपस्थित होते. (Pune BJP News)

संदीप खर्डेकर यांच्या माध्यमातून कार्यालयासाठी ही भेट देण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी सदर फ्रेम धीरज घाटे यांना भेट देऊन कार्यालयात लावण्याच्या सूचना केल्या.