Maharashtra Police News | पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे, शासन आदेश जारी

मुंबई : पोलीसनमा ऑनलाइन – Maharashtra Police News |  महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) हे आज (रविवार, 31 डिसेंबर 2023) रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त (DGP Retired) होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai CP) विवेक फणसळकर (IPS Vivek Phansalkar) यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने (Home Department Maharashtra) काढले आहेत. (Maharashtra Police News)

आयपीएस रजनीश शेठ हे गुरुवारी (मध्यानानंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. रजनीश सेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या ‘पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत आयपीएस विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हा आदेश शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी राज्यपालांच्या आदेशावरुन काढला आहेत. (Maharashtra Police News)

दरम्यान, रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती झाले होते. रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बीए ऑनर्स (एलएलबी) झालं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.