Maharashtra Political Crisis | भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले-‘नियुक्ती बेकायदेशीर असली तरी ते…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) नुकताच निकाल लागला. यावेळी न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Former Governor Bhagat Singh Koshyari) यांचे सर्व निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले. तसेच शिवसेनेच्या (Shiv Sena) मुख्य प्रतोदपदी (Main Pratod) भरत गोगावले यांनी करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण कोर्टाने (Maharashtra Political Crisis) नोंदवले. तर 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला.

सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली असली तरी ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी (Maharashtra Political Crisis) नियुक्त केले जाऊ शकतात, यासंदर्भात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सूचक विधान केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

न्यायालयाने भरत गोगावले यांच्या नियुक्ती बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत विचारले असता नार्वेकर म्हणाले, आपल्याला हा विषय समजून घेतला पाहिजे. शिवसेना प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची जी नियुक्ती करण्यात आली होती, ती नियुक्ती योग्य नसल्याचं केवळ न्यायालयाने सांगितलं आहे. याचं कारणही न्यायालयाने सांगितलं आहे. गोगावले हे राजकीय पार्टीचे प्रतिनिधी (Political Party) होते का? याबाबतची आपण खातरजमा करुन घ्यावी आणि त्यानंतर आपण निर्णय घ्यावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे गोगावले किंवा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्ती कायमस्वरुपी अयोग्य आहे, असं कोर्टाने म्हटले नाही. त्यामुळे त्यांची पुन्हा नियुक्ती करु शकतो.

गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत की सुनील प्रभू? याचे उत्तर देताना राजकीय पार्टीचं प्रतिनिधीत्व कोण करत होतं,
हे बघावं लागेल. गोगावलेंना प्रतोदपदी नियुक्ती केलेली व्यक्ती की सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना
प्रतोदपदी नियुक्त केलेली व्यक्ती… राजकीय पार्टीच्या वतीने व्हिप जारी करण्यासाठी यापैकी कोणती व्यक्ती
अधिकृत होती? हा आपल्याला पहावं लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय पार्टी कोणाची आहे, यापासून सुरु होणार आहे,
असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

Web Title :- Maharashtra Political Crisis | speaker rahul narvekar on bharat gogawale appointment as main pratod eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)