Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. परंतु मी त्यांच्यासोबत शेवटी गेलो. राज्यातील अनेक भागातील आमदार (MLA) शिंदे यांच्यासोबत गेले. जळगावचे आमदार गेले, मात्र तोपर्यंत मी निर्णय घेतला नाही. नागपूर ते मुंबई मी एकाटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहून काय केलं असतं? असा सवाल करत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सत्तांतराच्या वेळचा घटनाक्रम सांगितला. जळगाव जिल्ह्यातील साळवे गावात पाणी पुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) भूमिपूजनासाठी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सत्तांतराच्यावेळी माझ्या मनात नेमकं काय चाललं होतं? हा निर्णय घेण्यामागचे कारण त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून डिवचलं. मात्र, या सगळ्या सत्तांतराच्या काळात मी तर 32 नंबरला गेलो. माझ्या आधी 31 जण गेले होते. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यात पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले गेले होते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेजण जात होते.
सुरुवातीला नागपूरचाही पळाला, बुलढाण्याचाही पळाला, जळगावचे गेले, नाशिक, दादर, ठाण्याचे सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले.
नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं.
चार खंदे गेले तर मी एकटा काय करु? मग मी देखील शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घतला.

शिंदेंसोबत गेल्यानंतर मग माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशा टीका होत गेल्या. मी गेलो नसतो तर शिंदे
आणि फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे.
तो महाराष्ट्राचा झाला नसता. त्यामुळे मी एकटाच मूळ ट्रॅकवर आले असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title :-  Gulabrao Patil | gulabrao patil speaks on why he left uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पालिका आयुक्तांची पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई; नागरिक संतप्त

Ajit Pawar | मविआच्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपचं सूत्र ठरलं?, अजित पवारांनी मांडले सत्तेसाठीचं गणित