Chandrashekhar Bawankule | कर्नाटक निकालानंतर भाजप सावध, लोकसभेसाठी बावनकुळेंनी सांगितला मास्टर प्लान (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकमध्ये (Karnataka Assembly Elections) भाजपला धूळ चारत काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या विजयावर भाजप महाराष्ट्र (Maharashtra BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. कर्नाटक मधील पराभवानंतर भाजपने आगमी लोकसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसत आहे. याबाबत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माहिती दिली.

25 लाख युवा वॉरियर्स तयार करणार

कर्नाटक पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, कर्नाटकात भाजपला पराभव पत्करावा लागल्यानंतर महाराष्ट्रात भाजपतर्फे लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Vidhan Sabha) 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी 25 लाख युवा वॉरियर्स तयार केले जाणार आहेत. 18 ते 25 गटातील सक्रियपणे कम करणारे हे कार्यकर्ते असणार आहेत. युवकांकरिता आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभर ‘नमो चषक’ स्पर्धा होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीमुळे निवडणुका लांबल्या

महानगरपालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि नगरपालिकेच्या निवडणुका
(Municipality Elections) या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका
दाखल केल्याने लांबल्या आहेत. भाजपमुळे निवडणुका लांबल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोर्टातील याचिका
मागे घेतली तर राज्यात कधीही निवडणूका लागू शकतात, असेही बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान,
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत. विरोधकांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली
तर त्यांना राज्यात आपलीच सत्ता येईल असं वाटतं, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला.

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrasekhar bawankule reaction on karnataka assembly election result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट; बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Pune PMC News | पालिका आयुक्तांची पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई; नागरिक संतप्त