Maharashtra Political News | ‘गडकरींना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपने…’, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | कॅगच्या अहवालात (CAG report) मोदी सरकारच्या (Modi Government) सात योजनांमधील भ्रष्टाचारावरुन ताशेरे ओढले आहेत. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Wadettiwar) यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांचा काटा काढण्याची तयारी होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. (Maharashtra Political News) वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (दि.18) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची वाय बी चव्हाण सेंटर मुंबई (YB Chavan Center Mumbai) येथे सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपच्या (BJP) अंतर्गत राजकारणाचा (Maharashtra Political News) भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.

नितीन गडकरी यांच्याविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी
झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करुन त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक असू शकतं, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार
(Central Government) काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी
बोलताना सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Saurabh Rao | राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुणे विभागातील सर्व कार्यालयांनी सहभाग घ्यावा – विभागीय आयुक्त सौरभ राव