Maharashtra Political News | शरद पवार सर्वपक्षीय बैठकीत तर सुप्रिया सुळेंचे विधान भवनाच्या पायरीवर आंदोलन, विशेष अधिवेशन बोलवा

मुंबई : Maharashtra Political News | मराठा आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याने आणि यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याने राज्य सरकारची (State Govt) धावपळ उडाली आहे. आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. ही बैठक सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी मराठा आंदोलनावर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन (Special Session) बोलवा अशी मागणी करण्यात आली. (Maharashtra Political News)

या लक्षवेधी आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde), नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, प्रकाश फातर्पेकर इत्यादी सहभागी झाले होते.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की, सत्तेतील आमदारांचाही सरकारवर विश्वास नाही. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. धनगर, मराठा, लिंगायत समाज बांधवांचा आक्रोश दिसून येत आहे. सरकारने सगळ्या समाजाला धोका दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. (Maharashtra Political News)

सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर आरोप करताना म्हटले की, गृहमंत्री सातत्याने खोटे बोलतात, राज्यातील
परिस्थितीला गृहमंत्रीच जबाबदार आहेत. आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला झाला, आमदार संदीप क्षीरसागर
यांच्या घरी लहान लहान मुले आहेत. त्यांच्या पत्नी फोनवर बोलतानाही थरथर कापत होत्या.
या सर्व परिस्थितीला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस हवालदाराकडून छत्तीसगडमधून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; हवालदाराचा साथीदार अटकेत

All Political Parties Meeting On Maratha Reservation | मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव ! राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन