Maharashtra Political News | …अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत, शिवसेना आमदाराचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political News) चर्चांना उधाण आले. अशातच मंत्री अनिल पाटील (Minister Anil Patil) यांच्या वक्तव्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या. गल्लीतील कार्यालयापासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचे पाटील म्हणाले होते. याला शिवसेना आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्रीपद जाणार ही विरोधकांची अफवा आहे. मग कुठे अजित पवारांचे बॅनर लावायचे. तर कुठे माध्यमांना विधाने करायची. मात्र 2024 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील. मंत्री अनिल पाटील अथवा राष्ट्रवादी प्रवक्ते जे काही विधाने करत आहेत. त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री बनणार नाहीत. अजित पवारांच्या अडचणीत वाढ होईल हे नक्की, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. (Maharashtra Political News)

आमदार संजय शिरसाट म्हणाले, आमची बाजू मजबूत आहे. ज्यांची बाजू कमकुवत त्यांच्या मनात भीती असते. आम्ही वकिलांमार्फत सर्वकाही विधानसभा अध्यक्षांना (Legislative Assembly Speaker) दिले आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही. विधानसभा अध्यक्ष जो काही निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, आमची बाजू भक्कम आहे. ती आम्ही कोर्टातही सिद्ध केली असल्याचे शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.
शिंदे यांची खुर्ची धोक्यात आहे, मुख्यमंत्रीपद जाणार असं कयास विरोधकांकडून लावण्यात येत आहे.
कुठेतरी अजित पवार यांचा बॅनर लावण्यात येतो. पण असं काहीही होणार नाही.
2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | नेमक काय घडलं की ACP भारत गायकवाड यांनी पत्नी अन् पुतण्याला घातल्या गोळया; स्वतः केली आत्महत्या