Maharashtra Politics | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का, 13 वा खासदार शिंदे गटात सामील

0
782
Maharashtra Politics | another setback for uddhav thackeray shivsena mp gajanan kirtikar joins eknath shinde camp
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | जून महिन्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी (Shivsena MLA) बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडले. त्यानंतर एक एक करत शिवसेनेचे 12 खासदार (Shivsena MP) देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात (Maharashtra Politics) गेले. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. कारण त्यांच्या गटातील एका खासदाराने शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या (बाळासाहेबांची शिवसेना Balasahebanchi Shivsena) पक्षात प्रवेश केला (Maharashtra Politics) आहेत. गजानन किर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार असून लागोपाठ दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि गजानन किर्तीकर हे एकाच गाडीतून मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात एका कार्यक्रमासाठी आले. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील खासदारांची संख्या आता 13 झाली आहे.
श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), राहुल शेवाळे (Rahul Shewale), भावना गवळी (Bhavna Gawli),
संजय मंडलिक (Sanjay Mandlik), धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), कृपाल तुमाने (Krupal Tumane),
श्रीरंग बारणे (Shrirang Barne), हेमंत गोडसे (Hemant Godse), हेमंत पाटील (Hemant Patil),
सदाशीव लोखंडे (Sadashiv Lokhande), प्रताप जाधव (Pratap Jadhav), राजेंद्र गावित (Rajendra Gavit)
हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार असून आता गजानन किर्तीकर हे देखील सामील झाले आहेत.

उद्धव ठाकरे गटातील खासदार
अरविंद सावंत (Arvind Sawant), विनायक राऊत (Vinayak Raut), ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), राजन विचारे (Rajan Vikhar), संजय जाधव (Sanjay Jadhav)

 

Web Title :- Maharashtra Politics | another setback for uddhav thackeray shivsena mp gajanan kirtikar joins eknath shinde camp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना