Maharashtra Politics | भाजपच्या ‘या’ आमदारानी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा, म्हणाले – ‘प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, घरी…’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | वेदांता फॉक्सकॉननंतर (Vedanta Foxconn) टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यासंबंधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निशाण्यावर धरले आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि घरी बसून कष्ट घेता येत नाहीत, असे अतुल भातखळकर उद्धव ठाकरेंना उद्देशून (Maharashtra Politics) म्हणाले.

नाणार प्रकल्प (Nanar Project), बुलेट ट्रेन (Bullet Train) आणि आरे कारशेडला (Aarey Carshed) महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) विरोध केला होता. त्यामुळे आता वसुली करणाऱ्या महाविकास आघाडीने त्यांच्याच काळात अन्य राज्यात गेलेल्या प्रकल्पांसाठी उफराटे आरोप करु नयेत. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. आणि ते घरी बसून उपसता येत नाहीत, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत. सॅफ्रन कंपनीचा 1115 कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प हैद्राबादला जात असल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प नागपूरमध्ये उभारला जाणार होता. जमीन मिळण्यास वेळ होत असल्याने हा प्रकल्प हैद्राबादला गेल्याचे वृत्त आहे. (Maharashtra Politics)

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आल्यानंतर गेल्या चार महिन्यात राज्यातून चार प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. योगायोगाने हे सर्व प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यामुळे शिंदे सरकार गुजरातसाठी काम करत असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षांनी यासाठी शिंदे यांना धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंदे यांच्या गटाकडून या प्रकल्पाच्या जाण्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे. महाविकास आघाडीने प्रकल्पासाठी जागा आणि योग्य सवलती न दिल्याने ते राज्याबाहेर गेल्याचे आरोप सत्ताधारी पक्षांनी केले आहेत.

टाटा एअरबस हा लढाऊ विमाने बणविणारा आणि 22000 कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपूरमध्ये
होणार होता. पण ऐनवेळी तो गुजरातला गेला आहे. यापूर्वी देखील वेदांता फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर बनविणारा
प्रकल्प गुजरातला गेला होता.

Web Title :- Maharashtra Politics | bjp leader atul bhatkhalkar criticized shiv sena uddhav thackeray over saffron project gone to hyderabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा