Gas Cylinder | डिलीवरी बॉय यापुढे OTP दिल्याशिवाय गॅस सिलिंडर नाही देणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीत बदल केला जातो. त्यामुळे उद्या (दि. 1 नोव्हेंबर) पासून देखील नवीन किंमती लागू होणार आहेत. 14 आणि 19 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत बदल केला जातो. त्यामुळे 1 ऑक्टोबरला व्यावसायीक वापराच्या सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीत 25.5 रुपयांची घट केली गेली होती, पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे एलपीजी (LPG) गॅसच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.

तसेच येत्या महिन्यात आणखी एक नियम बदलला जाण्याची शक्यता आहे. घरपोच गॅस पोहोचविण्याच्या सुविधेत बदल केला जाऊ शकतो. गॅस घरपोच आल्यानंतर ओटीपी (OTP) दिल्यानंतरच मिळणार आहे. गॅस घरपोच आल्यानंतर ग्राहकांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो एजंटला दिल्यानंतरच गॅसचा सिलिंडर (Gas Cylinder) मिळणार आहे.

त्यामुळे येणाऱ्या महिन्यात ग्राहकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
यापुढे डिलीवरी देण्यासाठी आलेल्या माणसाला रजिस्टर मोबाईलवर आलेला ओटीपी (One Time Password)
दिल्यानंतरच गॅसचा बाटला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांचे अद्याप मोबाईल क्रमांक रजिस्टर नाहीत,
त्यांना ते प्राधान्याने करावे लागणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किंमती वाढल्याने
आता व्यावसायीक नंतर घरघुती गॅस सिलिंडरवर देखील त्याचा प्रभाव पडू शकतो.

Web Title :- Gas Cylinder | insurance claim lpg gas cylinder price delevery after otp gst rule change from 1 november 2022 see in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा