Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’

मुंबई : Maharashtra Politics | केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरविण्यासाठी बैठका घेत होते. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. या मागणीचे पत्र भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे. (Maharashtra Politics)

मुंबईतील 1 हजार 034 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच राऊतांच्या अटकेवर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते की, राऊत यांना विनाकारण कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. यानंतर भातखळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)

अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी माणसाला बेघर करणार्‍या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली.या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी करावी.

भातखळकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, तत्कालीन गृहनिर्माण सचिवांच्या विश्लेषण करणार्‍या पत्रावरून हे
स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकार्‍यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव
होता.
त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.
मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी.

Web Title :-  Maharashtra Politics | bjp mla atul bhatkhalkar demand to investigate role of ncp chief sharad pawar in patrachal case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Amravati ACB Trap | 1500 रुपये लाचेची मागणी करुन 500 रुपये लाच घेताना गुन्हे शाखेतील दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात