Maharashtra Politics | ‘कमळ’ आणि ‘ढाल तलवार’ मिळून महाविकास आघाडीला अशी जागा दाखवू की…, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) हंगामी आदेश देत तोडगा काढला. शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) नाव आणि निशाणी म्हणून पेटती मशाल (Mashal Symbol) दिली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) नावसह ढाल तलवार ही निवडणूक निशाणी दिली आहे. शिवसेनेचे मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील (MVA) घटकपक्ष काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने देखील शिवसेनेला पाठिंबा (Maharashtra Politics) दिला आहे. अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला सहाय्य करणार आहेत. त्यामुळे राज्यात भाजप आणि शिंदे गट विरोधात महाविकास आघाडी (MVA) सामना रंगला आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात शाब्दीक चकमक सुरु आहे.

नाना पटोले यांनी शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हावर भाष्य केले होते. भाजपची तलवार चालविणे हेच शिंदे गटाचे चिन्ह, असे पटोले म्हणाले होते. त्यावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना उत्तर दिले आहे. नाना पटोले तुम्ही मशालीची नाहीतर पंजाची चिंता करा. तसेच आमचे कमळ आणि ढाल तलवार मिळून काँग्रेसचा पराभव करेल, असे बावनकुळे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी भाजप खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही एक आहोत.
नाना पटोलेंनी ढाल तलवारीची चिंता करण्यापेक्षा पंजा, घड्याळ आणि मशालीची चिंता करावी.
आम्ही कमळ आणि ढाल तलवार मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू, की 2024 च्या निवडणुकीत महाविकास
आघाडीला (Maharashtra Politics) लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde led balasahebanchi shivsena and bjp alliance challenges congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा