Maharashtra Politics | ‘रणछोडदास’ मैदान सोडून पळून गेले’, शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिल्लोड येथील सभेवरुन शिवसेनेचा शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) आमनेसामने (Maharashtra Politics) आले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेला (Shivsamvad Yatra) सिल्लोड नगर परिषदेने (Sillod Municipal Council) परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे यांची सभा अखेर रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन शिंदे गटाने आदित्य ठाकरेंवर (Maharashtra Politics) बोचरी टीका करत, रणछोडदास मैदान सोडून पळून गेले, असे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील सभा भगवान महावीर चौकात होणार होती. अगदी त्याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील सभा आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या सभा एकाच दिवशी समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी (Maharashtra Politics) नाकारली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांची सभा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

आपली योग्यता तपासली पाहिजे

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, रणछोडदास यांनी सिल्लोडची सभा रद्द केली. मुख्यमंत्र्याला चॅलेंज देता आणि एका खासदाराला घाबरुन सभा रद्द करता. त्यामुळे तुम्ही आपली योग्यता तपासली पाहिजे. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाजूने सर्व शिवसैनिक आहेत. सभेला कुणी येणार नाही, म्हणून घाबरून तुम्ही रणछोडदास झाले आहेत, असा घणाघात म्हस्के यांनी केला.

एवढंस ते तोंड तुमचं…

नरेश म्हस्के यांनी ट्विटमध्ये म्हटले, असे कसे रणछोडदास,कोणाला घाबरून पळाले?,सभा रद्द करून पुन्हा घरामध्ये बसले?, नुसत्या पोकळ वल्गना तुमच्या…, मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करता??? एवढंस्स ते तोंड तुमचं किती मोठा घास भरता??? असा घणाघात म्हस्के यांनी केला.

Web Title :-  Maharashtra Politics | naresh mhaske targeted aditya thackeray as ranchoddas as sillods rally was cancelled

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘भविष्यात वेगळं काहीतरी… ‘, एकनाथ शिंदे-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीच्या आमदाराचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Breathe Into the Shadow | ‘या’ कारणामुळे जया बच्चन अभिषेकची ‘ब्रीथ 2’ सीरिज पाहणार नाही

MS Dhoni | IPS अधिकाऱ्याच्या विरोधात महेंद्रसिंग धोनीची याचिका, काय आहे संपूर्ण प्रकरण