Maharashtra Politics News | मुळ शिवसेना कोणती?, विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईला सुरुवात; घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (16 MLAs Disqualification) विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी कारवाईला (Maharashtra Politics News) सुरुवात केली आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाकडून पक्षाची घटना (Constitution of Political Parties) मागवणार आहेत. तसेच ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीस पाठवली जाणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल (Maharashtra Political Crisis) देताना मुळ राजकीय पक्ष कोणता आहे हे तपासावं असं न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार (Maharashtra Politics News) आता अध्यक्षांकडून मूळ राजीकय पक्ष तपासण्यासाठी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाणार आहे. तसेच शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) 54 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस पाठवून त्यांना पुढील सात दिवसांत भूमिका मांडण्यास सांगितले जाणार आहे.

जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, माझ्याकडे 54 आमदारांच्या
पाच याचिका आहेत. जुलै 2022 मध्ये पक्ष कोणता होता हे आधी ठरवावे लागणार आहे.
त्या आधारावर निर्णय घेतला जाईल. हे करत असताना शिवसेनेच्या घटनेचा देखील अभ्यास केला जाणार आहे. पक्ष घटनेनुसार चालतो का? हे देखील पाहिले जाईल, असं नार्वेकरांनी सांगितलं होतं.

Web Title :  Maharashtra Politics News | after the decision of the supreme court the action initiated by the speaker of the legislative assembly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआची समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समितीत समावेश; ठाकरे गटाकडून कोण? उद्धव ठाकरे घेणार निर्णय

ACB Demand Case | 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा