Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) मिशन बारामती हाती घेतले असून हे मिशन यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना रोखण्यासाठी भाजप नेत्यांकडून बारामती मतदार संघाचे (Baramati Constituency) अनेक दौरे केले जात आहेत. बारामती मतदारसंघात (Maharashtra Politics News) भाजपच्या गळाला मोठा मासा लागला आहे. पुरंदर हवेलीचे माजी आमदार (Former MLA of Purandar Haveli) अशोक टेकवडे (Ashok Tekawade) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीला (NCP) पहिला धक्का बसला आहे. माजी आमदार अशोक टेकवडे हे मंगळवारी (दि.16) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये कमळ हाती घेणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार होते. टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाने पुरंदर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.
कारण टेकवडे यांच्यानंतर राष्ट्रवादीला पुरंदरमध्ये आमदारकीसाठी (Maharashtra Politics News) यश आले नाही.
याचा मोठा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसणार असल्याची चर्चा आहे. गेल्या 38 वर्षापासून जनता दलाचे
(Janata Dal) दादा जाधवराव (Dada Jadhav Rao) यांची सत्ता घालवण्याचे काम अशोक टेकवडे यांनी केले आहे. टेकवडे हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

अशोक टेकवडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पुरंदच्या स्थानिक पक्षीय राजकारणावर नाराजी व्यक्त केली होती.
या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्याकडे अनेकवेळा तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही.
तसेच टेकवडे यांचा मुलगा सरपंच होऊ नये यासाठी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच कुरघोडी केली होती.
यामुळे देखील टेकवडे नाराज असल्याचे बोलले जात होते.

Web Title :-  Maharashtra Politics News | ashok devakate ex ncp mla of purandar may be join bjp big setback for nationalist congress party before lok sabha election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली