Maharashtra Politics News | ‘महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड आणि सरड्याची अभद्र युती’, भाजपचा घणाघात (व्हिडिओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | येत्या लोकसभा (Lok Sabha) व विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) मोठा इतिहास घडणार असून या निवडणुकीत तिवसा विधानसभेसह राज्यातील 200 पेक्षा जास्त आमदार (MLA) आणि अमरावतीसह 45 खासदार (MP) हे भाजप-शिवसेना युतीचे (BJP-Shiv Sena Alliance) विजयी होतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
यांनी केला. बावनकुळे बुधवारी रात्री अमरावती शहरातील नेहरू मैदानावर झालेल्या जाहिर सभेत बोलत होते. (Maharashtra Politics News) यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, राज्यातील विरोधकांची महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड आणि सरड्याची अभद्र युती आहे. घुबड दिवसा काम करु शकत नाही, ते केवळ रात्रीच बाहेर पडते, कावळा केवळ दिवसा दिसतो आणि सरडा वेळोवेळी रंग बदलतो. सरड्याने गरुडाची साथ सोडली आणि त्याचे दिवस फिरले, अशी ही महाविकास आघाडी टिकणारी नसून येत्या दिवसांत काँग्रेससह इतर विरोधकांचा पराभव निश्चित आहे. (Maharashtra Politics News) याउलट राज्यात भाजप नव्याने गरुडझेप घेऊन नवीन कीर्तिमान स्थापित करेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद चोरले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Former CM Uddhav Thackeray) खिशाला कधीच पेन दिसला नाही. मुख्यमंत्री म्हणून ते केवळ दोन वेळा मंत्रालयात गेले होते. घरीच बसून त्यांनी डोळे मिटूनच कामकाज सांभाळले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी तशी माहिती जगजाहीर करुन ठाकरेंच्या या कामाची जाहीर पावतीच दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मुख्यमंत्रीपद चोरल्याचा आरोप केला आहे.

त्यांच्याखाली आग लागली

उद्धव ठाकरे यांचे 50 आमदार सोडून गेले, तरी त्यांना त्याची पुसट कल्पनाही नव्हती आणि आता तेच मोठ-मोठ्या गोष्टी करीत आहेत. परंतु आता त्यांच्याखाली जी आग लागली आहे, त्यामुळेच भयंकर अस्वस्थ झाले असून काही दिवसांत त्यांनी मुंबई महापालिकेत केलेली लूट बाहेर येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Web Title : Maharashtra Politics News | maha vikas aghadi is an alliance of crow owl and lizard criticized by bjp state president chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा