Maharashtra Politics News | गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसेंमध्ये तडजोड, अब्रूनुकसानीचा दावा मागे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शिंदे गटाचे नेते (Shinde Group) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadse) यांनी पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाल्याने एकनाथ खडसे यांनी दावा मागे घेतला (Maharashtra Politics News) आहे. दोघांकडून गैरसमजुतीतून हा प्रकार झाला होता त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड तसेच समझोता (Compromise) झाल्याने दोघांकडून लेखी घेऊन खटला मागे घेतला. यामुळे गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एकनाथ खडसे हे 2016 मध्ये मंत्री असताना त्यांच्या विरोधात गुलाबराव पाटील यांनी भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात (Jalgaon District Court) गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. (Maharashtra Politics News) या दाव्याच्या तारखेला गुलाबराव पाटील गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेला एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील दोघे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड केला होता.

मंगळवारी सुनावणी पार पडली

या खटल्यात मंगळवारी (दि.27) जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती. या तारखेला दोन्ही नेते उपस्थित होते.
न्यायालयात अब्रू नुकसानीचा दाव्यासंदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला. या खटल्यासंदर्भात दोघांमध्ये समजूत झाली असून दोघांच्या गैरसमजातून हा दावा दाखल झाला होता. याबाबत दोघांनी न्यायालयात लेखी दिले आहे. त्यानुसार आता हा दावा मागे घेण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Web Title :   Maharashtra Politics News | settlement between eknath khadse and gulabrao patil due to compromise between case was dropped

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा