Maharashtra Politics | आनंद मठात न जाता उद्धव ठाकरे मुंबईला परतले, शिंदे गटातील नेत्याची टीका; म्हणाले…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शिवसेना पक्षातील फूटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाणे दौऱ्यावर आले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी या आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी ठाणे येथे आले असता उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी आनंद आश्रम येथे जाण्याचे टाळले. त्यावरूनचं आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Maharashtra Politics)
ठाण्यातील टेंभी नाका परिसरात आनंद दिघे यांचे निवासस्थान आहे. आनंद मठ हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळेचं उद्धव ठाकरे यांनी आनंद मठाकडे जाण्याचे टाळले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नरेश म्हस्के म्हणाले, ‘ते इथे आले नाही यावर आम्ही काय बोलणार? बाळासाहेबांनंतर जे नेतृत्व आलं त्यांचे पंख छाटण्याचं काम यांनी केलं. कधी त्यांची पुण्यतिथी दिसली नाही, जयंती दिसली नाही. गेली १०-१२ वर्ष ते कधी आनंद मठात आलेले मला आठवत नाही.’ असं म्हणत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
तसेच यावर पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, ‘एकदा ठाणे मनपा निवडणूक होती तेव्हा ते आले होते
तेव्हा निवडणूक होती म्हणून ते आले असतील. पोलिस बोलले होते उद्धव ठाकरे येणार होते, पण ते का आले नाहीत,
याबाबत आम्हाला माहित नाही. आमचं पक्ष कार्यालय आहे हे. आमच्याकडून विरोध का झाला असता?’
असा सवाल देखील यावेळी बोलताना नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.
‘याआधी उद्धव ठाकरे ठाण्यात यायचे तेव्हा जल्लोष व्हायचा, पण आज जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते
तेव्हाचे वातावरण पाहून खंत वाटली.’ असं देखील नरेश म्हस्के उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात लवकरच मोठी सभा घेणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.
Web Title :- Maharashtra Politics | uddhav thackeray in eknath shinde home ground thane did not go to anand math
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update