दहावी पास असणाऱ्यांनाही पोस्ट विभागात मिळेल नोकरी, महाराष्ट्रासाठी 2428 जागा; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : भारतीय पोस्ट विभागाने महाराष्ट्र सर्कलसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2428 पदांची भरती केली जाणार आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर (BPM) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी पास असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलावले जाणार आहे.

अर्ज कसा करावा ?

https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर 27 एप्रिल ते 26 मे यादरम्यान अर्ज करता येणार आहे. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतो.

एकूण पदे किती ?

ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय ?

किमान दहावी पास असणे गरजेचे आहे. यासह सायकलिंगही यायला हवे.

वयोमर्यादा काय ?

या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील.

अर्ज शुल्क किती ?

अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येणार आहे.

वेतनमान काय ?

ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) पदासाठी 12,000 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10,000 रुपये (4 तासांच्या सर्व्हिससाठी) पगार मिळणार आहे.

आरक्षणनिहाय जागा

खुला प्रवर्ग – 1105, एसटी- 244, एससी -191, ओबीसी- 565, ईडब्ल्यूएस 246, दिव्यांग- 77 जागांवर भरती होणार आहे.

अर्ज कसा करायचा ?

भरती पोर्टलवरून उमेदवारांनी सर्वप्रथम नोंदणीच्या लिंकवर क्लिक करून संबंधित पेजवर जाणे आवश्यक आहे आणि त्यानंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर उमेदवारांना त्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सक्षम होईल. उमेदवारांनी नोंदणीकृत क्रमांकाद्वारे विहित अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल. फी भरल्यानंतर उमेदवार ऑनलाईन लिंकवर अॅप्लिकेशन ऑनलाईन लिंकवर क्लिक करुन अर्ज सबमिशन पेजवर जाऊ शकतात.