MPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटामुळे लांबलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची (MPSC) तारीख प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे अगदी कमी दिवस उरले आहेत. आता पूर्व परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी मुख्य परीक्षेची तारीख कधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणे गरजेचे आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा झाली नाही. मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्द सध्या न्यायप्रविष्ट असल्याने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर, ठाकरे सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येणार नाही.