काळजी घ्या ! राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

पोलीसनामा ऑनलाईन – पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढल्याचे चित्र राज्यात पाहयला मिळत आहे. राज्यात सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनलॉक सुरु झाल्यानंतर आणि स्वंयशिस्त न पाळल्याने ही संख्या वाढत आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 2 ते 3 हजारांच्या घरात होती. गेल्या 24 तासात 5 हजार 760 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 88 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.दिवसेंदिवस वाढती कोरोनाची संख्या ही चिंता वाढवणारी आहे.

राज्यात 4 हजार 88 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 16 लाख 47 हजार 4 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.82 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 5 हजार 760 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 74 हजार 455 एवढी झाली आहे.

आजपर्यंत तपासलेल्या 1 कोटी 1 लाख 20 हजार 47 नमुन्यांपैकी 17लाख 74 हजार 455 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 22 हजार 819 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 4 हजार 569 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 79 हजार 873 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आज नोंद झालेल्या 62 मृत्यूंपैकी 35 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधले आहेत. तर 10 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 17 मृत्यू एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत आढळे 1092 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 1092 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 1053 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर मागील 24 तासांमध्ये मुंबईत 17 मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत मुंबईत एकूण 2 लाख 74 हजार 572 रुग्णांना करोनाची बाधा झाली. यापैकी एकूण 2 लाख 51 हजार 509 रुग्णांनी करोनावर मात केली. मुंबईत करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत एकूण 10 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला मुंबईत 9 हजार 325 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.