Maharashtra Revenue Department | पुण्यासह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यामध्ये बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार ! दोषी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई होणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Revenue Department | पुण्यातील हडपसर परिसरात झालेल्या बेकायदा दस्तनोंदणी (Illegal Registration) सारखेच प्रकार राज्यातील इतर काही जिल्हयात झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये ठाणे, नाशिकमधील सिन्नर, बागलाण आणि निफाड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विधिमंडळात दिली आहे. (Maharashtra Revenue Department)

पुणे शहर आणि जिल्हयातील आमदार माधुरी मिसाळ, सिध्दार्थ शिरोळे, संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना विखे-पाटील यांनी ही माहिती दिली आहे. विखे-पाटील पुढे बोलताना म्हणाले, राज्यात गेल्या 2 वर्षांत तुकडेबंदी कायदा (Fragmentation Act) आणि स्थावर मालमत्ता तथा संपदा (विकास व नियमन) कायदा Real Estate Regulatory Authority (RERA) या दोन्ही कायद्यांची पायमल्ली होत आहे. तसेच समक्षम प्राधिकरणाच्या बनावट ना-हरकत (NOC) सर्टिफिकेटव्दारे तब्बल 10 हजार 635 मालमत्तांची बेकायदा दस्तनोंदणी करण्यात आल्याचे चित्र आहे. तपासणीनंतर तुकडेबंदी कायदा आणि रेराचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Maharashtra Revenue Department)

त्यानंतर राज्य शासनाकडून पुणे शहरातील जवळपास सर्वच 27 दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये नोंदविण्यात आलेल्या दस्तांची पडताळणी करण्यासाठी तपासणी पठकाचे गठण करण्यात आले होते. पडताळणी पथकाने केलेल्या तपासणीत तुकडेबंदी कायदा आणि रेरा कायदाची पायमल्ली करत तब्बल 10 हजार 561 दस्तांची नोंदणी केल्याचे समोर आले. त्यानंतर सर्व संबंधित दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर समज, बदली, विभागीय चौकशी आणि निलंबन अशा प्रकारची कारवाई करण्यात आली असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे शहरामध्ये घडलेल्या प्रकारासारखाच प्रकार राज्यातील नाशिक जिल्हयातील सिन्नर, बागलाण,
निफाड तसेच ठाणे, लातूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि उस्मानाबाद अशा 7 जिल्ह्यांमध्येही झाला आहे.
बेकायदा दस्तनोंदणी आणि गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये असलेल्या दोषी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title :- Maharashtra Revenue Department | Illegal document registration, malpractices in Thane, Nashik, Aurangabad, Jalna, Latur, Osmanabad and Parbhani district along with Pune! Action will be taken against guilty administrative officers, employees – Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 80 हजाराची लाच घेताना उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Cyber Crime | मेसेजला प्रतिसाद देणे पडले महागात; प्राध्यापकाला सायबर चोरट्याने घातला 5 लाखांना गंडा

Pune Crime | न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल; प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाचा खून