Maharashtra School Reopen | राज्याच्या ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी अन् शहरांमधील 8 वी ते 12 वीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra School Reopen | महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने याबाबत निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

मुंबईबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी (Collector) यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. नुकतंच काही दिवसापूर्वी 17 ऑगस्टपासून राज्यातील 8 वी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. महाविद्यालयांनंतर आता राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने (Department of School Education) घेतला आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्याला राज्य सरकारचा (State Government) हिरवा कंदील दिला असतानाच मात्र, अंतिम निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘पालक आणि लोकप्रतिनिधींनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला जात आहे. यासाठी एक समिती स्थापन केली जाईल जी स्थानिक प्रशासनासोबत (Local administration) चर्चा करेल. असा त्यांनी म्हटलं आहे. तसेच, रुग्णसंख्या जास्त असलेल्या (रेड झोन) भागात शाळा सुरू करता येणार नाहीत, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घ्यायची आहे. ज्या ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, त्या ठिकाणी रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शाळा सुरू होतील, असे देखील वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितलं आहे.

काय आहे नियमावली –

– मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे शहरात वर्ग सुरू करण्याबाबत पालिका आयुक्त निर्णय घेणार.

– नगरपंचायत, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर निर्णयासाठी 4 सदस्यीय समिती निर्णय घेणार. जिल्हाधिकारी समितीचे प्रमुख असतील.

– शाळा सुरू करण्याआधी कमीतकमी 1 महिना शहरात-गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असावा.

– शिक्षकांचं लसीकरण होणं आवश्यक, गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये.

– अधिक विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, 15-20 विद्यार्थी एका वर्गात, दोन बाकांमध्ये 6 फुटांच अंतर

– शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात बोलावण्यात यावे.

Web Title : Maharashtra School Reopen | Classes 5th to 7th in rural areas of the state and 8th to 12th
classes in urban areas will start from 17th August

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

javelin throw | 7 ऑगस्टला देशभरात दरवर्षी होईल भालाफेक स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स संघाने केली घोषणा

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा