Maharashtra ST Strike | आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर; एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – एसटी कर्मचाऱ्यांच्या (Maharashtra ST Strike) मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी 18 ऑक्टोबर रोजी चर्चा करण्यात आली होती. परंतु बैठकीत आश्वासन देऊनही कोणताही निर्णय झाला नसल्याने आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात (Winter Session) आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) घरचा आहेर दिला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने हा इशारा दिला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत. एसटी कर्मचारी विलीनीकरण आंदोलनादरम्यान (Maharashtra ST Strike) मान्य केलेल्या 16 मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे या उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना मागण्या मान्य करण्यासाठी आठवण करून दिली आहे.

 

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (ramraje Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची एक समिती एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.
यावेळी 18 पैकी 16 मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीच कारवाई झालेली नाही.
त्यामुळे 19 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने पत्रात म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra ST Strike | gopichand padalkar and sadabhau khot warn hunger strike for demands of st employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा