Maharashtra State Police Sports Competition-2023 | उंच उडी क्रीडा प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या शितल पिंजारे यांचा नवा विक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Police Sports Competition-2023 | 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा-2023 ही या वर्षी पुण्यातील रामटेकडी, वानवडी येथील एस.आर.पी.एफ. ग्रुप 1 व 2 मैदानावर होत आहेत. 7 जानेवारी ते 13 जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होत आहे. मंगळवारी एस.आर.पी.एफ. ग्रुप 2 मैदानावर झालेल्या उंच उडी प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या (Konkan Region) पोलीस कॉन्स्टेबल शितल पिंजारे (Shital Pinjare) यांनी नवा विक्रम प्रस्थापीत करुन पहिला क्रमांक पटवला. (Maharashtra State Police Sports Competition-2023)

33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धांमध्ये राज्यातील 13 संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये स्विमिंग, हॉकी, फुटबॉल, हॅन्ड बॉल, रेसलिंग, ज्युडो, बॉक्सिंग, तायक्वांदो, कबड्डी, बॉडी बिल्डिंग, पावर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, अ‍ॅथलेटिक्स, क्रॉस-कंन्ट्री, बास्केट बॉल, खो-खो, हॉलीबॉल अशा एकूण 18 खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

मंगळवारी एस.आर.पी.एफ ग्रुप वानवडी पुणे येथे झालेल्या उंचउडी प्रकारात कोकण परिक्षेताच्या शितल पिंजारे
यांनी 1.65 मीटर उडी मारुन नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे.
शितर पिंजारे या रत्नागिरी पोलीस मुख्यालयात (Ratnagiri Police Headquarters) पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) म्हणून कार्यरत आहेत.
पिंजारे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोल्ड मिडल देण्यात आले.

स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस असून वानवडी येथे ज्युडो, तायक्वांदो, वेट लिफ्टिंग, बॉडी बिल्डींग, कबड्डी,
बास्केट बॉल, खो-खो, हॉलीबॉल, हॅन्ड बॉल, फुटबॉल स्पर्धा होणार आहेत.

Web Title :- Maharashtra State Police Sports Competition-2023 | A new record of Shital Pinjare of Konkan region in high jump sports

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर