शिक्षकांना गुजराती चॅनेलवरुन धडे देण्याचा शिक्षण विभागाचा विनोदी निर्णय 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरुन प्रशिक्षण देण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. त्यावरुन मोठा गदारोळ सुरु होण्याची शक्यता असून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यावर जोरदार टिका केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e03d44d-be19-11e8-9d3e-3389da1e7014′]

इयता पहिली आणि आठवीचा अभ्यासक्रम नुकताच बदलण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी संबंधित विषय शिक्षकांना येत्या २४ ते २६ सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मराठी सह्याद्री वाहिनीला डावलून वंदे गुजरात या वाहिनीची निवड केली आहे. महाराष्ट्रात ही वाहिनी दिसत नसल्यामुळे त्यासाठी शाळेत डिश सेटटॉप बॉक्स बसवावा, अथवा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी जिओ टीव्ही अ‍ॅपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी असे आदेशात म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही नाही अशा शिक्षकांनी इतर शाळेत जाऊन प्रशिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाच्या या आदेशावर बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार आहे. सरकारला गुजरातीचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असा उपरोधिक टोला हाणला आहे.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e3e2929-be1a-11e8-9290-b1f13aac481f’]

पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

गुजराती वंदे मातरम वाहिनीवरून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची बाब शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केली. ते म्हणाले की, हे प्रशिक्षण विनामूल्य असेल आणि ते पूर्णत: मराठी भाषेतूनच दिले जाणार आहे. राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे मोजावे लागले असते, परंतु गुजरात सरकारच्या स्वत:च्या १६ चॅनेलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यावहारिक बाजूचा विचारच नाही

गुजरात च्या वंदे गुजरात या चॅनेलला शासनाला पैसे द्यावे लागणार नसले तरी शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्री यांनी केवळ शासनापुरता विचार केला आहे. जे प्रशिक्षण घेणार, त्या शिक्षकांना या चॅनेलची सोय उपलब्ध आहे का याचा काहीही विचार केलेला नाही.

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजार पोलीसाचा बंदोबस्त

हे चॅनेल जरी विना मुल्य असले तरी सध्या ते महाराष्ट्रात दिसत नाही. ज्यांच्याकडे डिश आहे त्यांनीही ती घेताना त्यातील पॅकेजमध्ये गुजराती समजतच नसल्याने कोणत्याही शाळेने अथवा शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी घरीही गुजराती चॅनेल घेतलेले नाही. आता त्यांना जे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना त्यातील गुजराती पॅकेज घ्यावे लागेल. डिश टिव्हींमधील भाषा विभागात केवळ एक चॅनेल घेता येत नाही. त्यांना त्या भाषेचे पॅकेज घ्यावे लागते. त्यात अनेक चॅनेल येतात त्या सर्व चॅनेलचा मिळून एकत्रित दर आकारला जातो. त्यामुळे हे पॅकेज घेताना केवळ एक महिन्यासाठी जरी  शिक्षकांनी ते घेतले तरी त्यासाठी महिन्याला मोठा खर्च करावा लागेल. राज्यातील काही लाख शिक्षकांनी एक महिन्यासाठी जरी हे चॅनेलचे पॅकेज घेतले तरी काही कोटी रुपयांचा शिक्षकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

[amazon_link asins=’9386228971,817992162X,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bb91da9-be1a-11e8-82ce-5d54b2c0c5e8′]

त्याला जो पर्याय दिला आहे, तो जिओ मोबाईल ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचे त्यासाठी जिओ कार्ड घ्यायचे का?, त्यासाठी पुन्हा शिक्षकांना एका कंपनीचे कार्ड असताना दुसरे कार्ड घ्यावे लागणार आहे. शासनाला सह्याद्री चॅनेलला द्यावे लागले असते, त्याच्या काही पट पैशांचा शिक्षकांना भुर्दंड बसणार आहे. पण हे व्यावहारिक ज्ञान येथील राजकर्ते आणि प्रशासनाला कधी येणार हा प्रश्न आहे.