Maharashtra Vidhan Sabha Elections | पुण्यात विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार तयारी ! निष्ठावंत पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, विशाल धनवडे आणि संजय भोसले यांच्यावर जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Vidhan Sabha Elections | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने इतर काही महत्वाच्या जिल्ह्यांसह पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. आता ठाकरे गटाने पुण्यातील विधानसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विविध मतदारसंघाची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे दिली आहे. (Maharashtra Vidhan Sabha Elections)

आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त आमदार आणि नगरसेवक निवडून आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी चार माजी नगरसेवकांकडे प्रत्येकी दोन दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. हे चारही माजी नगरसेवक या मतदारसंघात निवडणूक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Elections)

अशी आहे जबाबदारी

  • पृथ्वीराज सुतार – कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
  • बाळासाहेब ओसवाल – पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ
  • विशाल धनवडे – कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
  • संजय भोसले – वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ

पक्ष संघटना मजबूत करणे, विविध कार्यक्रम घेणे, मतदारसंघाच्या माध्यमातून शहर पिंजून काढणे, अशा सूचना या चार माजी नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. या नव्या जबाबदारीतून पक्ष संघटना वाढवू, असा विश्वास या नगरसेवकांकडून व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?