Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?

मुंबई : Pune Lok Sabha-MNS Vasant More | आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे २० ते २५ जागा लढवणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शुक्रवारी अकोल्यात म्हटले होते. लोकसभेसाठी मनसेच्या नेत्यांकडून विविध मतदारसंघातून चाचपणी सुरू आहे. मनसेने उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. आता राजकीय वर्तुळात मनसेच्या ९ उमेदवारांची चर्चा रंगली आहे. (Pune Lok Sabha-MNS Vasant More)

दरम्यान, मनसे नेत्या शालिनी ठाकरे, वसंत मोरे यांचे त्यांच्या मतदारसंघात भावी खासदार असे बॅनर्स झळकले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी लोकसभा निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासाठी मनसेच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यात संभाव्य उमेदवार म्हणून खालील नावांची चर्चा सुरू आहे. (Pune Lok Sabha-MNS Vasant More)

  • कल्याण लोकसभा – आमदार राजू पाटील
  • ठाणे लोकसभा – अभिजित पानसे/ अविनाश जाधव
  • पुणे लोकसभा – वसंत मोरे
  • उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- शालिनी ठाकरे
  • दक्षिण मुंबई लोकसभा- बाळा नांदगावकर
  • छत्रपती संभाजीनगर लोकसभा – प्रकाश महाजन
  • सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
  • चंद्रपूर लोकसभा – राजू उंबरकर
  • रायगड लोकसभा – वैभव खेडेकर

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मागील काही सातत्याने पदाधिकारी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. तसेच लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी महत्वाच्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. हे नेते विविध मतदार संघात जाऊन ताकदीचा आढावा घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. यावेळी ते म्हणाले, लोकसभा मतदारसंघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे. आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक असेल ते ठणकावून सांगणारा आहे.

नांदगावकर म्हणाले, आधीचे असो वा आताचे सरकार. ते विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत.
सत्तेतून पैसा कमावतात. लोकांच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आगामी
लोकसभा निवडणुकीत मनसे २०-२५ जागा लढवणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Leader Vijayraj Shinde Car Accident | भाजपा नेत्याच्या कारला एसटीची धडक, एअरबॅगमुळे जीव वाचला