Maharashtra Weather Update | पुढील 5 दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | राज्यातील वातावरण बदलत आहे. राज्याच्या काही भागात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून 22 जूनपर्यंत मुंबईसह (Mumbai) तळकोकणाच्या (Konkan) पश्चिम किनारपट्टीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पूर्व मान्सूनपूर्व पाऊस (Rain) पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे. 22 जूनपर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस केवळ कोकण आणि गोवा (Goa) उपविभागापुरताच मर्यादित राहू शकतो, असेही खुळे म्हणाले.

 

पूर्वमोसमी वळीव पावसाच्या (Maharashtra Weather Update) सध्याच्या या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगणातून संपूर्ण विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) साधारण 23 जून रोजी नैऋत्य मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो. मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळे मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखाही उर्जितावस्थेत येण्याची शक्यता जाणवत आहे.

 

दरम्यानच्या या कालावधीतच (दि. 23 ते 29 जून) तळ कोकणसहीत संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होऊन, सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले आहेत. दि. 23 ते 29 जून या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

विदर्भात मात्र सध्य:स्थित असलेली दिवसाची उष्णतेची लाटसदृश (Heat Wave) स्थिती आणि रात्रीची दमट वातावरणातून होणारी अस्वस्थता, दि. 19 जूनपर्यंत कायम राहू शकते. उर्वरित महाराष्ट्रातील तापमानात (Temperature) मात्र विशेष फरक जाणवणार नाही. दि. 23 जूनला सुरु होणाऱ्या आणि 6 जुलैला संपणाऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अशा मोसमी पावसाची (Seasonal Rain) शक्यता जाणवते असल्याचे खुळे म्हणाले.
दि. 7 जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊन खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा.
कारण 7 जुलैनंतर आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते, असे खुळे म्हणाले.

 

 

 

 

Web Title :  Maharashtra Weather Update | moderate rain likely over konkan including mumbai for the next five days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा