Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Women’s Policy | राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून (Maha Vikas Aghadi Government) नव्या महिला धोरणाची (Maharashtra Women’s Policy) घोषणा करण्यात येणार आहे. ही घोषणा 8 मार्च जागतिक महिला दिनी करण्यात येणार आहे. याबाबत माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली आहे. नव्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केली जाणार आहे.

 

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ”महिला धोरणात एलजीबीटीक्यू (तृतीयपंथी, समलैंगिक आदी) आणि वारांगना यांच्या कल्याणाचाही विचार करण्यात आला आहे. तसेच, नव्या सर्वसमावेशक महिला धोरणाचा मसुदा आमच्या विभागाने तयार केला आहे. 85 पानांच्या या महिला धोरणावर आगामी आठवड्यात जनसुनावणी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Women’s Policy)

 

दरम्यान, महिला धोरणातील कलमांची अंमलबजावणी किती दिवसात केली जाईल, अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना कोणत्या असतील आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य शासनाच्या (Maharashtra Government) कोणत्या विभागाची असेल, या मुद्द्यांचा समावेश धोरणातच करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नवीन महिला धोरण –

– महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित असे रात्र निवारे उभारणार.

– दुष्काळग्रस्त आणि दुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट संपविणार.

– महापालिका, नगरपालिकेच्या स्थायी समित्यांमध्ये महिलांना आरक्षण.

– सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचे महिला अनुकूल डिझाईन असेल.

– महिलांना वारस हक्क मिळतो की नाही यावर सरकारची नजर.

– फ्लॅट, घरांच्या खरेदीवेळी महिलांना सामायिक मालकीचा हक्क.

– महिलांना जमिनी लीजवर देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

– महिलांच्या नावावर घर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत.

– सार्वजनिक वाहन तळांवर महिलांसाठी शौचालये, रॅम्प, रेलिंग, चेंजिंग रूम, एस्केलेटर, सॅनिटरी पॅड, व्हेंडिंग मशीन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, तसेच मदतीसाठी असेल पॅनिक बटणसेवा. ते दाबताच यंत्रणा धावून येईल.

– राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि अन्य प्रमुख मार्गांवर दर 25 किलोमीटरवर महिला शौचालये उभारणार.

– ऑटो, टॅक्सी, जड वाहनांसाठीचे परवाने देताना महिलांना प्राधान्य.

 

Web Title :- Maharashtra Women’s Policy | new womens policy announcement will be made on 8th march equal share of women in wealth independent old age home maharashtra thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉकद्वारे करोडपती बनायचे आहे का? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवून शोधा हजारो पट रिटर्न देणारे मल्टीबॅगर शेयर

 

Urfi Javed Viral Video | उर्फी जावेदनं घातला बाजूनी पूर्णपणे जाळी असलेला ड्रेस, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर लागली आग

 

Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या