शोरूममधून ‘नागीण डान्स’ करत चोरल्या महागड्या पैठणी ; ४ आरोपी ताब्यात

मनमाड : पोलिसनामा ऑनलाईन – पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील एका शोरूममध्ये चोरट्यांनी नागीण डान्स करत महागड्या पैठणी साडया चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींकडून 48 पैठणी, 12 घागरे आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हे आरोपीनी नागीन डान्स करत पैठणी साड्या चोरताना सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन आरोपी अजून बेपत्ता आहेत.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी कि, काही मागील काही दिवसांपूर्वी येवल्यातील एका शोरूममधून चोरटयांनी नागीन डान्स करत महागड्या पैठणी चोरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून या प्रकरणातील 4 फरार आरोपीना अटक केली आहे. मात्र त्यातील 2 आरोपी आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल शिंदे, राजू गुंजाळ, सागर शिंदे व सागर घोडेराव अशी आहेत.