Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | पुणे : निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात संसंदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला- मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 

Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकातच ‘अनुभवमंटप’ च्या (Anubhavmantap) माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया घातला (Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune). जातीभेदाच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. (CM Eknath Shinde Unveiled The Statue Of Mahatma Basaveshwar At Nigdi Pune)

 

निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे MP Shrirang Barne), आमदार उमा खापरे (MLA Uma Khapre), महेश लांडगे (MLA Mahesh Landge), अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap), अण्णा बनसोडे (MLA Anna Bansode), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh),पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal), पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) आदी उपस्थित होते. (Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune)

 

देवाशी म्हणजे शिवाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही अशी मांडणी त्यांनी केली. त्यांच्या तत्वज्ञानाची जगभरातील विद्यापीठांनी दखल घेतली. महात्मा बसवेश्वर यांनी खऱ्या अर्थाने समता, बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार केला. महापुरुषांचे समाजासाठी योगदान मोठे आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आपण करत असतो. महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड केली नाही.

 

महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हे प्रेरणास्थळ, उर्जास्थळ आहे. महात्मा बसवेश्वरांचा लंडन येथेही पुतळा उभारण्यात आला आहे. हे महापुरुष आपल्याला आदर्श देऊन गेले आहेत. निगडी येथील हा पुतळा लोकवर्गणी लोकसहभागातून केला याला जास्त महत्त्व आहे. त्यांचा त्याग, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण हे मोठे काम केले आहे, असे श्री.शिंदे म्हणाले. यापुढेही पुतळा परिसर सुशोभिकरण संबंधित आवश्यक कामासाठी पैसे कमी पडणार नाहीत. या परिसरातील दफन भूमीचा प्रश्नही सोडविण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष आहे. हीदेखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन शासन काम करत आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. लोकांच्या जीवनामध्ये अनेक बदल घडविण्यासाठी अनेक नियम बदलले, असेही ते म्हणाले.

 

प्रास्ताविकात आयुक्त शेखर सिंह यांनी पुतळा उभारणीमागची संकल्पना स्पष्ट केली.
समतावादी मूल्ये रुजविण्यासाठी महात्मा बसेवश्वरांनी उभे आयुष्य प्रयत्न केले.
त्यांनी न्याय, बंधूता आणि एकतेची शिकवण दिली. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले.
त्यांचे विचार मानवी जीवनाला प्रगत करणारे त्यांचे विचार होते.
महापुरुषांच्या अशा विचारांमुळे नव्या पिढीला दिशा मिळते असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी नारायणराव बहिरवडे यांनीही विचार व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने निगडी प्राधिकरण येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
सुमारे ३ हजार १५० चौरस मीटर क्षेत्र परिसरात पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.
या पुतळ्यासमोरील जागेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पुतळ्याभोवती २२५ मीटर लांबीची सीमाभिंत बांधण्यात आली आहे.

 

Web Title :  Mahatma Basaveshwar Statue Nigdi Pune | Chief Minister Eknath Shinde unveiled the
statue of Mahatma Basaveshwar at Nigdi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा