CM Eknath Shinde | ‘असा मुख्यमंत्री कधी पाहिलाय का? जे बोलतो ते…’ – एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही जी आश्वासनं देतो, ती सगळी आश्वासनं पूर्ण करतो. मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे, जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री पाहिलाय का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी जनतेला विचारला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari Yojana) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) बोलत होते. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदीचे (Indrayani River) शुद्धीकरण केलं जाणार असल्याचे आश्वासन दिले.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) पुढे म्हणाले, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठंही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलाय का?, आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. आतापर्य़ंत बघा, आम्ही सगळं पूर्ण करतोय. हे सरकार खोटं नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

 

 

 

इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण करणार

गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीत प्रचंड प्रमाणात प्रदूषण असल्याचे समोर आलं आहे. या नदीत केमिकल युक्त पाणी सोडलं जात होतं. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु होता. त्यामुळे आता इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंतांना (Uday Samant) दिलेल्या आहेत. यानिमित्ताने इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीचं शुद्धीकरण केलं जाईल.

 

जाहिरातीमुळे तुटेल इतकी कच्ची युती नाही

जाहिरातीमुळे एकानाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे.
यावर बोलताना शिंदे म्हणाले, आम्ही एकदम मजबूत आहोत.
ही युती एका विचाराने निर्माण झाली आहे. ती एखाद्या जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही.
एकाने सर्वेक्षण केलं आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला पसंती मिळत आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 80 टक्के पेक्षा जास्तीची पसंती मिळाली.

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm of maharashtra eknath shinde statement i am the
chief minister who walking on the streets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा