RSS प्रमुख मोहन भागवत गांधींबाबत म्हणाले – ‘त्यांना हिंदू असल्याची लाज वाटली नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सोमवारी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ जगमोहनसिंग राजपूत लिखित “गांधी को समझने का यही समय” या पुस्तकाचे प्रकाशन केले. या वेळी भागवत म्हणाले की, ‘गांधीजींना समजून घेण्याची हीच वेळ आहे’. जातीय अंतर, धोरणांचे अवमूल्यन, हे आजच्या सरकारच्या संदर्भात नाही, या पत्रकारांनी समजून घ्यायला हवे. हिंद स्वराज वाचल्यानंतर हे लक्षात येते की गांधीजींच्या मनात ब्रिटीशांना हकलवून लावल्यानंतर भारत कसा असेल याची कल्पना होती. म्हणूनच गांधीजींना आजही आदर आणि सन्मानाने स्मरण केले जाते.

भागवत म्हणाले की, हे खरे आहे की गांधीजींच्या कल्पनेतील भारत आज नाही, आम्ही असे २० वर्षांपूर्वी म्हणायचो, पण आज देशभर फिरल्यानंतर मी म्हणू शकतो की गांधीजींच्या कल्पनेतील भारताला आज सुरुवात झाली आहे. भागवत पुढे म्हणाले की, गांधीजींना मिळालेल्या वातावरणाप्रमाणे आणि त्यांना मिळालेल्या समाजाच्या अनुषंगाने त्यांनी विचार केला. आज आपण कार्बन कॉपी करू शकत नाही, जर गांधी असते तर त्यांनी ते थांबवले असते. त्यांनी म्हटले कि, गांधी यांची सत्यनिष्ठा निःसंशय आहे. जो त्यांचा प्रमुख विरोधक आहे तो देखील त्यांच्या सत्यनिष्ठेवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही.

संघ प्रमुख म्हणाले की, गांधीजी बॅरिस्टर म्हणून आले, पैसे कमावू शकले असते. त्यांना आपण हिंदू असल्याची कोणतीही लाज वाटली नाही. ते सनातनी हिंदू आहे. पण त्यांनी इतर धर्माचा देखील आदर केला. तसेच महात्मा गांधींनी कधीही लोकप्रियता आणि यश-अपयशाची पर्वा केली नाही. गांधीजींच्या सत्यतेचा धडा आपण आजपासून सुरू केला पाहिजे, प्रामाणिकपणा हे सर्वात चांगले धोरण आहे. भागवत म्हणाले, हेडगेवार यांनी सांगितले होते की, गांधीजींचे जीवन फक्त आठवण नव्हे तर पाळले पाहिजे, आता परिस्थिती बदलत आहे. हे आमच्या बाजूचे आहे आणि हे विरोधकांसाठी आहे असे शिक्षणात सांगू नये. शिक्षणामध्ये सत्यता असली पाहिजे.

परिस्थिती बदलेल, मला आशा आहे की संपूर्ण रंग एक होईल. ते म्हणाले की, गांधीजींच्या चळवळीत गडबड झाली तर ते प्रायश्चित करायचे. आजच्या चळवळीत प्रायश्चित करण्यासाठी कोणी नाही. पण आजच्या चळवळीमध्ये जो कोणी मारहाण करतो किंवा तुरूंगात जातो तो प्रायश्चित्त करतो.

You might also like