12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ज्या लोकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये ७ हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) कंपनीकडून या भरती संदर्भातील जाहिरात देण्यात आली आहे. या पदांसाठी तुम्ही २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकता. उमेदवार mahadiscom.in  या महाडिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. यामध्ये सात हजार पदांपैकी पाच हजार पदे विद्युत सहाय्यकांची तर दोन हजार पदे उपकेंद्र सहाय्यकांच्या पदांचा समावेश आहे.

पदांची प्रवर्गनिहाय विभागणी खालीलप्रमाणे

प्रवर्ग विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक

सर्वसाधारण –  १६३७ ६५६

महिला –  १५०० ६००

क्रीडापटू –  २५० ९८

माजी कर्मचारी –  ७५० ३००

प्रकल्पग्रस्त –  २५० ९९

भूकंपग्रस्त –   ९९ ४०

शिकाऊ उमेदवार –  ५०० २०१

अनाथ –  १४ ६

एकूण –  ५००० २०००

वयोमर्यादा

या पदांसाठी उमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त २७ असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ करण्यात आली आहे. तसेच माजी कर्मचारी आणि दिव्यांगांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे करण्यात आली आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा १२वी उत्तीर्ण असावा. तसेच बिझनेस स्टोरीजचे नॅशनल ट्रेड ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेंटर) किंवा इलेक्ट्रिशिअन / टर्शिअरी दोन वर्षांचे पदविका प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्जाची फी

यासाठी कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

वेतन

विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी अंदाजे १८ हजार ते २७ हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतींद्वारे करण्यात येणार आहे.