‘या’ टेनिसपटूवर झाले पैसे बुडविल्याचे आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अंतराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगमध्ये (आयपीटीएल ) सहभागी असलेल्या दूरचित्रवाणी कंपनीचे पैसे बुडविल्याचा आरोप भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपती याच्यावर लावण्यात आला आहे. याविषयी अनेक खेळाडूंनी अद्याप मौन बाळगले असले तरी यावर्षी क्रोएशियाचा आघाडीचा टेनिसपटू मारिन चिलीचने आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाने जोर पकडला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dafe4917-c973-11e8-b6b6-03bc849c0d40′]

ब्रॉडकास्ट स्पोर्ट्स न्यूजने एक पत्रक काढून भूपती आणि आयपीटीएलने आपल्यासह अनेक समभागधारकांचे पैसे थकविले, याबाबतचे आरोप केले आहेत. ‘‘संपूर्ण प्रोडक्शन विभाग, तंत्रज्ञान सेवा पुरविणारे, वितरक, पंच आणि टेनिसकोर्ट बनविणाऱ्यांना २२ महिन्यांनंतरही फी, व्हिसा खर्च, दैनंदिन भत्ता आणि प्रवासाचे मानधन मिळाले नाही,’’ असे या पत्रकात म्हटले आहे. खेळाडूंना पैसे देण्याची जबाबदारी लीगची होती तर प्रसारण कंपनी आणि अन्य जणांचे पैसे देण्याची जबाबदारी ही लिजेंडरी समूहाची होती.

[amazon_link asins=’B00KJI2GIM,B00TAZXI96′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89cfd403-c977-11e8-9007-f162b9c1870c’]

आयपीटीएल

भूपतीने २०१४मध्ये आयपीटीएल या लीगला सुरुवात केली. रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांच्यासारखे आघाडीचे स्टार टेनिसपटू या लीगमध्ये खेळले. मात्र आर्थिक संकट आल्यामुळे ही लीग २०१६ नंतर बंद पडली.

[amazon_link asins=’B073WX582T,B01N54ZM9W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b2f9da77-c977-11e8-bd3e-232e198988a4′]

भूपतीने झटकले हात

महेश भूपती म्हणाला की , ‘अजून जवळपास पाच मिलियन डॉलर्सची थकबाकी आहे. याचे मलाही दुःख आहे; कारण ज्यांचे पैसे थकले आहेत त्यात खेळाडूदेखील आहेत. काही अधिकारी आहेत. या सगळ्यांना मी खूप वर्षे ओळखतो आहे. यामुळे त्यांना त्रास होत असल्याने मलाही दुःख होते आहे. मात्र हे सगळी थकबाकी मी लवकरच भरून काढणार आहे. मात्र त्यासाठी थोडासा वेळ लागेल,’’ असेही भूपतीने सांगितले.

पैसे मिळण्यास विलंब झाल्याचे भूपतीने मान्य केले असले तरी ही स्पर्धा माझ्यामुळे बंद पडली नाही. या लीगमधील एका संघाचे हक्क असलेल्या लिजेंडरी समूहाने दिलेल्या खोटय़ा आश्वासनांमुळे तसेच लीगचे प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीमुळे हा आर्थिक गुंता झाल्याचाही स्पर्धा बंद करावी लागली, अशी स्पष्टोक्ती भूपतीने दिली आहे.तसेच या परिस्थितीला आपण जबाबदार नसल्याचे सांगत भूपतीने या प्रकरणी आपले हात झटकले आहेत.[amazon_link asins=’B014CLL3KS,B07BHFT3VQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb4eb9a2-c977-11e8-9191-818092ca5731′]