Makar Sankranti SPL : सिनेमाच्या पडद्यावर स्टार्सची ‘पतंगबाजी’ ! सलमान, आमिर शाहरुखची कोणी गुल केली पतंग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज मकरसंक्रांत (Makar Sankranti) आहे. या सणात पतंगबाजी खूप पहायला मिळते. सिनेमा आणि गाण्यांमध्येही याची क्रेज पहायला मिळाली आहे. बॉलिवूड स्टार शाहरुन खानच्या रईस सिनेमातील उडी उडी जाए हे गाणं आणि पुलकित सम्राटच्या फुकरेमधील अंबरसरिया गाण्यातही पतंग उडवण्याचा सीन आहे. ही गाणी अशी आहेत जी खूप हिटही झाली आहेत.

मकरसंक्रांतीच्या निमित्तानं आपण ते सिनेमे आणि गाणी पाहणार आहोत ज्यात या सणाचा उल्लेख तर आहेच सोबतच यातील पात्र पतंगबाजी करताना दिसत आहेत.

हम दिल दे चुके सनम
या सिनेमात सलमान खान आणि ऐश्वर्या राय प्रमुख भूमिकेत होते. संजय लीला भन्साळींनी या सिनेमात पतंगबाजीचा सीन खूप चांगल्या पद्धतीनं दाखवला होता. ढील दे गाणं सर्वांच्याच लक्षात असेल. या गाण्यात मस्ती, रोमँस, उत्सवाचे रंग सर्वकाही पहायला मिळतं.

1999 साली आलेल्या अर्थ सिनेमातही पतंगबाजीचं एक गाणं आहे. रूठ गया रे असं या गाण्याचं नाव आहे. यात आमिर खान आणि नंदिता दास यांची जोडी पाहायला मिळते.

1957 साली आलेल्या भाभी सिनेमातील चली चली पतंग गाणंही खूप चर्चित गाणं आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी या गाण्याला आवाज दिला होता.