काळजाचा ठोका चुकवणारी ‘पीहू’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ?

वृत्तसंस्था :  ‘‘पीहू’ चा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय असे असतानाच आता ‘‘पीहू’’ नवा रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे. याआधी कोणत्याही चित्रपटात केवळ दोन वर्षाची चिमुकली अभिनेत्री तुम्ही पाहिली नसेल. पण आगामी ‘‘पीहू’’ हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक करेल असे वाटते आहे. दोन वर्षाच्या मायरा विश्वविकर्मा या मुलीने ‘‘पीहू’’ची भूमिका केली आहे.
विनोद काप्री दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून, कलाकार मंडळींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव लवकरच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारणसुद्धा दोन वर्षांची ‘पीहू’ अर्थात मायरा आहे. कारण या चित्रपटात दोन वर्षाच्या चिमुकल्या ‘पीहू’ ची  मुख्य भूमिका आहे . इतक्या लहान वयाची मुख्य अभिनेत्री म्हणून‘पीहू’चे नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड  मध्ये येण्याची शक्यता आहे. जर ‘‘पीहू’’ची  नोंद ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली तर भारतासाठी ती मोठी आनंदाची बाब  असेल यात शंका नाही .
वेड लावणारा पिहूचा ट्रेलर –
संपूर्ण चित्रपट एकाच कलाकारावर आधारित असून दोन वर्षांच्या चिमुकलीनं मुख्य भूमिका साकारणारा हा पहिलाच चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘पीहू’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी विचारणा केली आहे. आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांची मुलगी एकटी घरात काय काय करू शकेल आणि कोणत्या परिस्थितीतून जाईल हे जिथं विचार करणंसुद्धा अवघड आहे. दोन वर्षांची चिमुकली पीहू अशाच परिस्थितीतून जात असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेटकऱ्यांकडून दोन वर्षांच्या मायरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोठ्या अभिनेत्यानांही भारावून टाकणारी पिहू  –
दोन वर्षांच्या मायराच्या अभिनयाने मोठमोठे कलाकार आणि नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत. इतकंच काय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे. अर्थात तिच्याकडून हे अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.