Malaika Arora | घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराच्या कपड्यांबाबत अरबाज खानने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Malaika Arora | मलायका अरोरा ही भारतीय मॉडेल, दूरचित्रवाणी-कलाकार, नर्तिका व हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. बॉलीवूड अभिनेत्री मलायका सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मलायकाचे लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर 1998 मध्ये झालं होतं. लग्नाच्या जवळपास 19 वर्षांनी म्हणजेच 2017 तिने अरबाजपासून घटस्फोट घेतला. या दोघांच्या घटस्फोटाबाबत बरीच चर्चा झाली पण त्यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण कधीच समोर आलं नाही. ती सध्या अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (Malaika Arora)

 

बऱ्याचदा अरबाज व मलायकाचा घटस्फोट तिच्या कपड्यांमुळे झाल असावं अश्या बातम्या हि पुढे येत होत्या.अलीकडेच एका मुलाखतीत अरबाज खानला विचारण्यात आलं की मलायकाच्या कपड्यांवर त्याने कधी आक्षेप घेतला होता का? याबाबत अरबाज खान म्हणाला, “मी मलायकाला तिच्या कपड्यांबद्दल कधीच बंधनं लादली नाहीत. मी तिच्या कपड्यांचे नेहमीच समर्थन करायचो. कारण मला माहित आहे की एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी थांबवले तर तो तिच गोष्टी जास्त करतो. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही.” (Malaika Arora)

 

सध्या दोघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
मलायका अरोराने 2017 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली.
दुसरीकडे, अरबाज खान त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

 

Web Title :- Malaika Arora | arbaaz khan malaika arora got divorced because of her bold dressing sense know the truth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrashekhar Bawankule | सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार?; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर