Malaika Arora | मलायकाच्या टीशर्टवर खास मेसेज; अर्जुनसोबत ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चांना उधाण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचे सुप्रसिद्ध कपल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर (Malaika Arora And Arjun Kapoor) हे नेहमी चर्चेत असलेले कपल आहे. या कपलचा मोठा चाहता वर्ग असून अनेकदा त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. मलायका (Malaika Arora) व अर्जुन यांच्यातील वयाच्या फरकामुळे देखील त्यांना ट्रोल केले जाते. यावेळी मात्र त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर सर्वत्र मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप (Malaika And Arjun Break up) झाले असल्याचे बोलले जात आहे. यावर या कपलने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी मलायकाचा (Malaika Arora) खास मेसेज असलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या टॉपवरील मेसेजने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अभिनेत्री मलायाक अरोरा हिचा चाहता वर्ग मोठा असल्याने पापाराझी देखील नेहमी तिच्या फोटोसाठी धडपड करत असतात. यावेळी देखील पापराझींनी मलायकाला तिच्या मुंबईतील घरातून बाहेर येताना कॅमेऱ्यामध्ये कैद केले. यावेळी मलायकाने पापाराझींना काही पोज देखील दिल्या. तिने व्हाईट कलरचा स्वेटशर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट स्टाईल केली होती. सोबतच मोठी बॅग आणि काळा गॉगल देखील मलायकाने घातला होता. तिच्या स्वेटशर्टने सर्वांचे लक्ष वेधले. यावर मोठ्या स्माईल तर होत्याच पण सोबतच एक मेसेज देखील लिहिण्यात आला होता. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या स्वेटशर्टवर ‘Lets fall apart’ म्हणजेच चला वेगळे होऊया’ असे लिहिले होते. तिच्या या स्वेटशर्टवरील मेसेजने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर हे नेहमी एकत्र दिसून येत होते.मात्र मागील काही दिवसांपासून ते एकत्र फिरणे टाळत आहेत. अर्जुनने सोशल मीडियावर त्याचे काही व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटा दिसत होता. या फोटोवर मलायकाने कोणतीही रिॲक्शन देखील दिली नाही. तसेच मुंबईतील (Mumbai) एका इव्हेंटमध्ये देखील मलायका एकटीच आली होती. तेव्हापासून या कपलमध्ये सारे काही अलबेल चालू नसल्याचे बोलले जात आहे. अभिनेता अर्जुन कपूर देखील एका पार्टीमध्ये मलायका शिवाय आला होता. यावेळी त्याचे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला (Kusha Kapila) हिच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेता अर्जुन कपूरने ब्रेकअपनंतर दुसरी गर्लफ्रेंड पाहिली असून तो आता कुशा कपिला हिला डेट (Arjun Kapoor And Kusha Kapila Affair) कत असल्याचे बोलले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Subhedar Movie | ‘सुभेदार’ चित्रपटासाठी नागराज मंजुळेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय